आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिकसोबत झळकणार मुक्ता बर्वे, या मराठी फिल्ममध्ये बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड '

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ता बर्वे आणि विक्रम फडणवीससोबत हृतिक रोशन - Divya Marathi
मुक्ता बर्वे आणि विक्रम फडणवीससोबत हृतिक रोशन

मराठी सिनेमातून हाताळले जाणारे वेगवेगळे विषय आणि त्याला मिळणारं यश यामुळे बॉलिवूड कलाकार मराठी सिनेमांकडे आकर्षित झाले आहेत. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनही त्याला अपवाद राहिलेला नाही. हृतिक लवकरच फॅशन डिझायनर विक्रम फडणवीस दिग्दर्शित 'हृदयांतर' या मराठी सिनेमात झळकणार आहे. काम करत आहे. हृतिकची मराठी सिनेमात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एका दाम्पत्याची त्यांच्या वैवाहिक जीवनातली वादळांशी असलेली झुंज दाखवणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाची कथा अत्यंत चांगली आणि आव्हानात्मक असल्याने ती कोणीही नाकारणे शक्यच नव्हते. हृतिकमुळे या सिनेमा अधिक चांगला होणार असल्याचे विक्रम फडणवीस म्हणाले. हृतिकला या सिनेमाची कथा ऐकवली. वीस मिनिटाची मिटींग झाली आणि त्याने या सिनेमात काम करण्यास तात्काळ होकार दिला, असेही फडणवीस यांनी सांगितले.
 
'काल मी माझा जवळचा मित्र विक्रम फडणीसच्या 'हृदयांतर' या सिनेमासाठी खूप चांगल्या कलाकारांसोबत चित्रीकरण केले,' असे टि्वट हृतिकने केले आहे. तसेच त्याने या सिनेमाच्या चित्रीकरणाचे काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. हृदयांतरमध्ये सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात मनिष पॉलदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात शाहरुख खानच्या हस्ते या सिनेमाचा मुहूर्त पार पडला होता. सध्या या सिनेमाचे चित्रीकरण सुरु असून यावर्षी डिसेंबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे समजते.  
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, सिनेमाच्या सेटवरील हृतिकची छायाचित्रे..
बातम्या आणखी आहेत...