आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिकने ट्विटद्वारे जाहीर केली त्याचा मराठी चित्रपट \'हृदयांतर\'ची रिलीज डेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करणारा आणि बॉलीवूडचा ग्रीक गॉड म्हणून प्रसिद्ध असलेला हृतिक रोशन विक्रम फडणीस यांच्या हृदयांतर चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची रिलीज डेट हृतिकने ट्विटरद्वारे जाहीर केली आहे. 9 जून रोजी चित्रपट रिलीज होत असल्याचे हृतिकने जाहीर केले. 

ट्वीटमध्ये हृतिकने म्हटले आहे, ‘हृदयांतर’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे. या चित्रपटाचा मी एक भाग असल्याचाही मला आनंद आहे. माझा मित्र विक्रम फडणीस याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हृतिकचा पहिला मराठी चित्रपट असलेल्या हृदयांतर मध्ये मुक्ता बर्वे, सुबोध भावे आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत आहेत. प्रताप सरनाईक आणि फडणीस यांनीच चित्रपटाची निर्मिती केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून चित्रपटाच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांसमोर चित्रपट येत असल्याने एकाचवेळी आनंद आणि टेन्शनही असल्याचे विक्रम फडणीस म्हणाले. 

शाहरूखच्या हस्ते झाला होता मुहूर्त 
गेल्या महिन्यात हृतिकने चित्रपटासाठी शुटिंग केले होते. त्यावेळीही त्याने ट्विटरवर फोटो शेअर करून मराठी कलाकारांचे कौतुक केले होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चित्रपटाचे शुटिंग सुरू झाले होते. त्यावेळी शाहरूख खानच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, हृतिकने केलेले ट्विट आणि त्याचे सेटवरील शुटिंगचे PHOTO..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...