आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

In Pics: हृतिक रोशनने लाँच केला 'हृदयांतर'चा ट्रेलर, शामक दावरसह मुक्ता-सुबोधची हजेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘हृदयांतर’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या सुपरस्टार हृतिक रोशनने रविवारी (28 मे) या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला. या सिनेमाद्वारे फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस मराठी सिनेसृष्टीत निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपलं पहिलं पाऊल ठेवतोय. त्यामुळे आपल्या मित्राच्या सिनेमात काम करताना हृतिक रोशन खूप खुश आहे. यापूर्वी हृतिकने या सिनेमाच्या रिलीजची तारीख त्याच्या ट्विटर अकाउंटवर जाहिर केली होती आणि आता रविवारी मुंबईमध्य़े झालेल्या दिमाखदार सोहळ्याला स्वखुशीने हजेरी लावून हृतिकने या सोहळ्याची शान वाढवली आणि ट्रेलर लाँच केला.  हृदयस्पर्शी आहे मुक्ता-सुबोध स्टारर 'हृदयांतर'चा Trailer, हृतिक रोशनची दिसली झलक
 
 
सुपरस्टार हृतिक रोशन आणि विक्रम फडणीस यांची मैत्री खूप जुनी आहे. त्या मैत्रीखातरच हृतिक पहिल्यांदाच एका मराठी चित्रपट सोहळ्यात दिसला. यावेळी हृतिक रोशन म्हणाला, "ही फिल्म जेव्हा माझ्याकडे आली, तेव्हा मी दुस-या एका प्रोजेक्टवर काम करत होतो. पण विक्रमने जेव्हा मला चित्रपटाचा विषय ऐकवला. तेव्हा त्या दुस-या कामातून माझं लक्ष या फिल्मकडे वेधलं गेलं. विक्रमचा सिनेमाविषयी असलेला असामान्य दृष्टीकोण, त्याविषयी असलेलं सखोल ज्ञान आणि आवड यामुळेच ही सुंदर फिल्म आकाराला आली आहे. हा हृदयांतर सिनेमा विक्रमचं हृदय आहे. या चित्रपटाद्वारे मला उत्तम कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाल्याबद्दल मी विक्रमचा आभारी आहे." 'क्रिश 4' मध्ये मराठी हिरोईन! हृतिक काय म्हणाला नेमकं.. मराठी 'इकडे-तिकडे' एवढंच येतं

निर्माता पुर्वेश सरनाईक म्हणतो, "विक्रमने जेव्हा मला या चित्रपटाचे नाव सांगितले. त्यानंतर मी सिनेमाची स्क्रिप्टही ऐकली नाही. कारण या फिल्मचे नावचं एवढे भारदस्त आणि अर्थपूर्ण आहे. मला अतिशय आनंद होतोय, की, हृतिक रोशन आणि श्यामक डावर सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्यातनाम सेलिब्रिटी आमच्या या सिनेमात आहेत. "

विक्रम फडणीस म्हणतो, “हृतिक रोशन या सिनेमाचा हिस्सा असणं, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हृतिक नेहमीच या ना त्या प्रकाराने हृदयांतरच्या पाठीशी उभा राहिलाय. त्यामुळेच हृतिकच्या हस्ते हृदयांतर चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणं ही आमच्या संपूर्ण हृदयांतरच्या टीमसाठी खुप महत्वाची गोष्ट आहे. हा आमच्यासाठी नेहमीच एक स्पेशल दिवस ठरला आहे.”

गुलशन कुमार प्रस्तुत, यंग बेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या आणि टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेल्या विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’मध्ये मुक्ता बर्वे, सुबोध भावे आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा येत्या 7 जुलैला सर्वत्र प्रदर्शित होतोय.

पुढील स्लाईड्सवर बघा, 'हृदयांतर'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटची खास क्षणचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...