आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुमा कुरैशी पहिल्यांदाच मराठीत, जाणून घ्या का मागावी लागली तिला उमेश कुलकर्णीची माफी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः डावीकडे - अभिनेत्री हुमा कुरैशी, उजवीकडे - 'हायवे' सिनेमातील हुमाची झलक)
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडला गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांचे आकर्षण निर्माण झाले आहे. अजय देवगण, रितेश देशमुख, अक्षयकुमार यांनी मराठी चित्रपट निर्मिती मध्ये पाऊल ठेवलेच आहे. तर गेल्या काही वर्षात सलमान खान, रितेश देशमुख, हृषिता भट, उर्मिला मातोंडकर यांनी मराठी चित्रपटांत अभिनय केला आहे. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत, बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीसुध्दा आपल्याला मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ’हायवे’. गिरीश कुलकर्णी लिखीत आणि उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘हायवे’ या चित्रपटात एका डेली सोपमधल्या अभिनेत्रीच्या भूमिकेत हुमा दिसेल.
हुमाने या चित्रपटाविषयी Divyamarathi.com ला सांगते, "उमेश कुलकर्णी माझ्याकडे चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन येईपर्यंत मी कधीही मराठी फिल्म करेन असा विचारही केला नव्हता. उमेशने मला चित्रपटाविषयी सांगितल्यावर, योगायोगाने मी माझ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या काही मित्र-मैत्रिणींना एकदा भेटले आणि गप्पांमध्ये ‘विहीर’ सिनेमाचा विषय निघाला. मी चित्रपट पाहिला नव्हता आणि मला लक्षात आलं की नुकतेच तर मी ‘विहीर’च्या फिल्ममेकरला भेटले होते. आणि त्याने मला त्याची आगामी फिल्मही ऑफर केली आहे. पण मी त्याला अजून उत्तरच दिले नाही. हे लक्षात आल्यावर मग माझी उत्सुकता चाळवली गेली. मी त्या रात्री घरी पोहोचले आणि लगेच ‘विहीर’ पाहिली. आणि पाठोपाठ ‘देऊळ’ही पाहिली आणि दुस-या दिवशी सकाळी उठल्यावर पहिला फोन उमेशला केला. त्याची पहिल्यांदा माफी मागितली आणि सांगितलं की मी अगोदरच फोन करायला होता. मला माहितच नव्हतं, तू इतका सक्षम फिल्ममेकर आहेस. मला तूझ्या चित्रपटात भूमिका करायची इच्छा आहे. मग अशा पध्दतीने ‘हायवे’ मध्ये मला भूमिका मिळाली. स्किप्ट ऐकल्यावर या फिल्मचा आपण हिस्सा व्हावं, असं मनापासून वाटलं आणि फिल्म करायचे ठरवले. उमेशचा चित्रपटाकडे पाहायचा दृष्टीकोन मला इम्प्रेस करून गेला. मला असं वाटतं, या सिनेमाला तो मराठी भाषेत आहे म्हणून आपण ‘रिजनल सिनेमा’ या कॅटेगरीत न ठेवता, त्याला ‘वल्डसिनेमा’ असंच म्हटलं पाहिजे. कारण भाषा मराठी असली तरीही त्याची अनुभूती वैश्विक आहे. अशा चित्रपटाचा आपण हिस्सा होऊ शकलो, याचा मला अभिमान वाटतो. यात कोणी एक व्यक्ती मुख्य भूमिकेत नाही. यात ‘हायवे’च मुख्य भूमिकेत आहे आणि तो आम्हांला आत्मपरिक्षण करायला लावतो आहे.”
पहिल्यांदा जरी हुमाला उमेशविषयी माहित नसले तरीही आता चित्रपट केल्यावर हुमा उमेशविषयी भरभरून बोलते, ”उमेश कुलकर्णीच्या फिल्ममेकिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले आहे. वेगवेगळया फिल्म फेस्टिवल्समध्ये त्याच्या याअगोदरच्या फिल्म्स गेल्या होत्या. मी जेव्हा त्याच्याबद्दल वाचलं, तेव्हा मला त्याच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा झाली. आणि अशा दिग्दर्शकाबद्दल काम केलेच पाहिजे असे वाटले. उमेशच्या जर तुम्ही फिल्म्स पाहिल्या, तर तुम्हांला लक्षात येते,की त्या चित्रपटामध्ये खूप काही नाट्य घडतं नाही. त्याचा सिनेमामध्ये एक साधेपण असते. पण त्याचे कथानक तो अशा पध्दतीने समोर ठेवतो. की आपण चित्रपट पाहत राहतो. त्याच्या सिनेमातून आयुष्य ब-याचदा खूप साध्या पध्दतीने समोर उलगडतं जाते. चित्रपट बनवण्यामागे व्यावसायिक उद्देश नसतो. मला या चित्रपटातून बक्कळ पैसा कमवायचा आहे, असे उद्दिष्ट नसते. तसाच ‘हायवे’ सुध्दा आहे.”
आपल्या भूमिकेबद्दल सांगताना हुमा पूढे म्हणते, ”यामध्ये माझी भूमिका एका अभिनेत्रीची आहे. त्यामुळे मला हिंदीमध्ये संभाषण करायचे होते. अगदी एखादी ओळ मराठीत बोलायची होती. माझे पात्र अगदी थोड्यावेळासाठी फिल्ममध्ये येते. पण ते तुम्हांला चित्रपट संपल्यावरही लक्षात राहते."
नोटः या चित्रपटात हुमासोबत टिस्का चोप्रा या बॉलिवूड अभिनेत्रीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नुकताच मुंबईत 'हायवे' या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सोहळ्याची खास क्षणचित्रे तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता...
फोटोः प्रदीप चव्हाण