आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझं आणि वैभवचं Affair नाही, सांगतेय, ‘Mrs. सदाचारी’ प्रार्थना बेहेरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशिष वाघ निर्मित-दिग्दर्शित ‘मिस्टर एन्ड मिसेस सदाचारी’ चित्रपटाचा समारंभ होता. आणि ढोल-ताशांच्या गजरात ‘शिवा वेड्स गार्गी’ लिहीलेल्या आलिशान गाडीतून ‘मिस्टर सदाचारी’ वैभव तत्ववादी एन्ड ‘मिसेस सदाचारी’ प्रार्थना बेहेरे दोघंही उतरले. आणि नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्याचं त्यांच्या घरी जसं साग्रसंगीत स्वागत व्हावं, तसं जमलेल्या व-हाडी मंडळींनी त्यांचं स्वागत केलं.
ह्या सगळ्या स्वागत समारंभानंतर जरा मोकळं होऊन फिल्मची नायिका प्रार्थना बेहेरे म्हणाली, “फिल्मच्या फस्ट लूक पासून, ते पोस्टर पासून ते अगदी आत्ताच्या ग्रँड समारंभापर्यंत सगळीकडे आमचं लग्न झाल्यासारखं दिसतंय. त्यामुळे आता आमचं दोघांचं खरंच सुत जुळल्याचं गॉसिप चालू झालंय. एवढी ह्याविषयी चर्चा रंगलीय की, माझ्या आई-वडिलांनी सुध्दा हे नक्की काय? असं विचारलं. त्यामुळे मी आता मी आशिषलाही गंमतीने म्हणाले, की, अरे, ह्या फिल्मच्या प्रमोशनमध्ये तू चक्क माझं लग्नचं लावलंयस”
प्रार्थना पूढे म्हणते, “मी गार्गी नावाच्या मुलीच्या भुमिकेत आहे. गार्गी आणि शीवा कसे प्रेमात पडतात, त्यांच्या प्रेमाला होणारा विरोध आणि त्याविरूध्द त्यांनी एकत्र येणं, अशी ही एक सुंदर प्रेमकथा आहे. एका ब्राम्हण कुटूंबातली मी मुलगी असल्याने माझा एकदम पारंपारिक लूक आहे.”
वैभव ह्या फिल्ममधून एका एक्शन हिरोच्या भुमिकेत दिसतोय. तो आपल्या भुमिकेविषयी सांगताना म्हणतो, “मला चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली होती. एक्शन, डान्स, रोमँस अशा अनेक गोष्टी ह्यात आहेत. ह्यात माझी एकदम हिरोसारखी एन्ट्री झाली. अशा पध्दतीची माझी पहिली फिल्म आहे.”
ह्या एक्शन-ड्रामा फिल्मविषयी फिल्ममेकर आशिष वाघ म्हणतात, “‘मिस्टर एन्ड मिसेस रामाचारी’ ह्या कन्नड सिनेमाचा हा रिमेक आहे. मात्र रिमेक करताना आपल्या मराठी संस्कृतीनुसार आणि बोलीभाषेनुसार ह्यात बदल करण्यात आलेत. आपण बॉलीवूड सिनेमा पाह्यला जातो. तेव्हा त्यात कॉमेडीमध्येही काही मारधाड असते. आपल्या मराठीत मात्र आशयघन चांगला दर्जेदार सिनेमा असतो. पण एक्शन ड्रामा नसतो. आजकालच्या युवापिढीला जे बॉलीवूड फिल्म पाहतात, त्यांना मराठीत हे पाहायला मिळत, नसल्याने ते मराठीकडे काहीअंशी पाठ फिरवतात, हे माझ्या लक्षात आल्यावर मग मी एक्शन फिल्म बनवायचं ठरवलं.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मिस्टर एन्ड मिसेस सदाचारी चित्रपटाचा ट्रेलर
(फोटा - स्वप्निल चव्हाण)
बातम्या आणखी आहेत...