आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Can Wear Bikini, But Hesitate To Do Intimate Scenes, Says Smita Gondkar

बिकिनी घालून HOT दिसणं सोप्पं, पण सेन्शुअस अदा दाखवणं कठीण, म्हणतेय स्मिता गोंदकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री स्मिता गोंदकर, बिकिनीमध्ये 
 
मराठी अभिनेत्री चित्रपटांमध्ये छोटे कपडे घालणं किंवा किसींग सीन करण्यापासून लांब पळतात, त्या हिंदी अभिनेत्रींसारख्या साइज झिरो नसतात, हे पूर्वीचे गैरसमज नव्या पिढीतल्या अभिनेत्रींनी मोडून काढलेत. आजकाल आपणहून त्या छोटे कपडे घालायला तयार असतात. एवढंच नाही तर, इंटिमेट सीन आणि बिकिनी सुध्दा आता त्या घालू लागल्यात, हे गेल्या काही वर्षांतल्या चित्रपटांनी दाखवलंच आहे. आणि बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणे ‘हॉट एन्ड सेक्सी’ मराठी अभिनेत्रीही दिसू शकतात, हे ‘पप्पी दे पारूला’ ह्या गाण्यामधून स्मिता गोंदकरने दाखवूनच दिलंय.
 
बिकिनी घातल्यानंतर आता तिला इंटिमेट सीन किंवा सेन्शुअस सीन करण्याबद्दल मनात काही किंतू असेल, असं फिल्म इंडस्ट्रीत कोणालाही वाटतं नव्हतं. पण बिकिनी घालणा-या स्मिता गोंदकरला सेन्शुअस अदा दाखवायला लागल्यावर घाम फुटला होता. याबद्दल स्मिता म्हणते, “मी घरात एकुलती एक मुलगी आहे. लहानपणापासून भावांसोबत वाढल्याने मी घरात मुलांसारखे छोटे कपडे घालायची. लाजणं हा माझा स्वभावचं नाही. बाइकराइडिंग, ते हार्स राइडिंग सगळ्या गोष्टी मुलांसारख्या केलेल्या आहेत. माझे आई-वडिल दोघेही नॅशनल स्विमर आहेत. मी अमेरिकेत राहिलीय. त्यामुळे बिकिनी ही आमच्या घरात खूप सेन्शुअस गोष्ट कधीच नव्हती. स्विमींग सूट किंवा बिकिनी इतर कपड्यांप्रमाणेच मला वाटतात. मला असं वाटतं, बिकिनीचा तुम्ही फार बाऊ केलात, तर मग तुम्हांला ती गोष्ट फारच एक्सपोज करणारी वाटेल. जर तुम्ही बिकिनी कॅरी नाही करू शकत, तर तुम्हांला लाजायला होईल. पण माझ्यासाठी बिकिनी घालणं, फारच कम्फर्टेबल आहे. त्यामुळे ‘पप्पी दे पारूला’मध्ये मी मस्त बीचवर बिकिनी घालून फिरू शकले. “
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, इंटिमेट सीन करताना काय झालं, स्मिताला