आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मी ब्रेनलेस कॉमेडी बनवत नाही’, गिरीश कुलकर्णींचा बॉलीवूड फिल्ममेकर्सना टोला?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्ममेकर गिरीश कुलकर्णी म्हणतायत, ब्रेनलेस फिल्मस? अशक्यच !
एक फक्कड मल्टिस्टारर कॉमेडी फिल्म बनवली, की १०० करोड आपल्या खिशात, असा एक यशस्वी फिल्म्स बनवण्याचा फॉर्म्युला गेले काही वर्ष बॉलीवूडमध्ये वापरात आहे. अनेक निर्माते-वितरक तर मल्टिस्टारर चित्रपटांना कॉमेडीची फोडणी नसेल तर चित्रपटाला हात लावायलाच तयार नसतात, अशीही लेखक-दिग्दर्शक सर्रास ओरड करतात. गेली कित्येक वर्ष ‘मस्ती’, ‘गोलमाल’, ‘हाऊसफुल’सारखे अनेक ब्रेनलेस कॉमेडी चित्रपट बनवले आणि पाहिले जातायत.
पण ‘वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’ सारख्या दर्जेदार चित्रपटांच्या संहिता लिहीणा-या अभिनेते, फिल्ममेकर गिरीश कुलकर्णींना मात्र अशा ब्रेनलेस कॉमेडी चित्रपटांची एलर्जी आहे. ते म्हणतात, “एक फिल्ममेकर म्हणून जेव्हा मी इतरांकडून ते जेव्हा स्वत:च्याच संहितेला आणि चित्रपटाला ‘ब्रेनलेस कॉमेडी’ चित्रपट म्हणतात, तेव्हा मला ते पटतंच नाही. ते जर ‘ब्रेनलेस’ असेल तर मग कसले आलंय, मनोरंजन, तो मुर्खपणा आहे. मनोरंजनाचा उगम बुध्दीतनंच आहे, मग जर डोकंच बाजूला ठेवायचं असेल तर कसं होणार मनोरंजन. माणसाच्या मनोरंजनाच्या अनेक भूका आहेत. त्या फिल्ममेकर्सने भागवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी कधीच असे ‘ब्रेनलेस’ चित्रपट बनवू शकत नाही. डोकं ताळ्यावर ठेवून होणारे मनोरंजन मला महत्वाचे वाटते. आज वल्ड सिनेमामध्ये आपलं नाव आहे. आणि प्रेक्षकही सुजाण झालेला आहे. त्याच्या बुध्दीला पटेल, रूचेल असे उत्तमोत्तम चित्रपट आणि संहिता लिहीणे ही फिल्ममेकर म्हणून मला जबाबदारी वाटते.”
गिरीश कुलकर्णी पूढे म्हणतात, “अर्थपूर्ण सिनेमा बनवला पाहिजे, जो आपला सिनेमा म्हणून जगात सगळीकडे अभिमानाने मिरवता यायला हवा. प्रेक्षक आज भाजी-पोळी शिवाय चायनिजही खातायत. तर मग कलेबाबतची त्यांची संवेदनाही विस्तारीत होईल, असे सिनेमे निर्माण करण्याची फिल्ममेकरची जबाबदारी आहे, असं मला वाटतं.”
गिरीश कुलकर्णींनी ह्याचं काहीतरी वेगळं आणि अर्थपूर्ण करायचं ह्या ध्यासापोटी ‘हायवे’ चित्रपटाचे लेखन-निर्मिती केलीय. ‘हायवे’ची संहिता गिरीश कुलकर्णी दोन वर्ष लिहीत होते. ते सांगतात, “पटकथेच्या बाबतीत एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. आजचं आपलं जगणं हे मल्टीटास्किंग झालं आहे. एकमेकांशी बोलता-बोलता, आपण व्हॉट्सअपवरही कुणाशी तरी बोलत असतो. त्याचप्रमाणे हे दोन्ही करताना आपण इतरही काही तरी काम करत असतो.. एकावेळी आपण मल्टीडॅमेशनल जगू पाहतोय. तसाच सिनेमाही बनवण्याचा प्रयत्न केलाय.काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला.“
‘हायवे’ चित्रपटामध्ये एकूण ४० पात्रांचा समावेश आहे. एकाचवेळी हायवेवरून जाणारी ही ४० जण प्रवास करत असतात, ते वेगवेगळ्या गाड्यांमधून. पण निरनिराळ्या वाहनांनी प्रवास करणा-या या त-हत-हेच्या लोकांचे स्वभाव ‘हायवे’मधून आपल्यासमोर येणार आहेत.
‘हायवे’ चित्रपट येत्या २४ जुलैला रिलीज होतोय.
पुढील स्लाइडमध्ये, पाहा, हुमा कुरेशीचा बनतोय, एमएमएस