आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजश्रीने नव्हे शशांकने फाइल केलाय घटस्फोटाचा अर्ज, जाणून घ्या काय म्हणाली तेजश्री?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(तेजश्री प्रधान)

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील लोकप्रिय जोडी श्री आणि जान्हवी अर्थातच अभिनेता शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान घटस्फोट घेणार असल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. 8 फेब्रुवारी 2014 रोजी हे दोघे विवाहबद्ध झाले होते. पुण्यात धुमधडाक्यात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. मात्र लग्नाच्या काही दिवसांतच दोघांमध्ये बिनसले आणि अखेर पुण्याच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल झाल्याचे समजते. शशांकने घटस्फोटाची मागणी करताना व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यातील प्रसंगांचे दाखले दिले आहेत.
मला काहीही विचारु नका. हा अर्ज त्यांनी फाइल केलाय, सो जे प्रश्न असतील ते त्यालाच विचारा. मी काहीही फाइल केले नाही, असे तेजश्रीने म्हटले असल्याचे सूत्रांकडून समजते.
लग्नाच्या वर्षभरातच त्यांच्या खऱ्या आयुष्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा खरं तर काही दिवसांपूर्वीच सोशल नेटवर्किंग साइट्सवर रंगू लागली होती. मात्र त्याच काळात मालिकेमध्येही त्यांच्यात दुरावा आल्याचे कथानक सुरू होते. ते दोघे घटस्फोटाचा दावा दाखल करण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे मालिकेत दाखवण्यात येत होते. त्यामुळे त्यांच्या खऱ्या आयुष्यातील दुरावा हा कदाचित प्रसिद्धीचा स्टंट असावा, अशी प्रेक्षकांची समजूत झाली होती. अखेर हा स्टंट नसून त्यांच्या नात्यात वर्षभरातच कटुता निर्माण झाल्याचे प्रकाशात आले आहे.
या दोघांच्या संसारात निर्माण झालेल्या अडचणी लवकरात लवकर दूर व्हाव्या आणि हे दोघे पुन्हा एकदा गुण्यागोविंदाने नांदावे, अशीच इच्छा त्यांचे चाहते व्यक्त करत आहेत.
घटस्फोटाच्या अर्जाने या या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे उघड केले आहे, मात्र या दोघांनी अनेक रोमँटिक क्षण एकत्र घालवले आहेत. या दोघांचे हे खास क्षण पाहा छायाचित्रांमध्ये...