आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंकू राजगुरुने केले उघड, ‘सैराट’साठी चार कोटी मिळालेच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि यातील मुख्य कलाकार रिंकू आणि आकाश हे नवोदित चेहरे एका रात्रीतून सुपरस्टार्स झाले. अभिनयाशी तीळमात्रही संबंध नसताना या दोघांनी केलेल्या कामाने सर्वच भारावून गेले. सिनेमातील आर्चीच्या भूमिकेसाठी रिंकू राजगुरुला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अजूनही या सिनेमाविषयी चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवर ८५ कोटींपेक्षाही अधिक कमाई करून ‘सैराट’ने मोठा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
या सिनेमाच्या सर्वाधिक कमाईमुळे अनेक बातम्या चर्चेत आल्या. या सिनेमाने कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याने सिनेमातील लीड स्टार्स अर्थातच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांना प्रत्येकी चार कोटी रुपये बोनस म्हणून दिले गेले असल्याचे म्हटले गेले होते. मात्र याविषयी पहिल्यांदाच रिंकूने मौन तोडले आहे. सैराटसाठी चार कोटी रुपये मिळाले नसल्याचे रिंकूने स्पष्ट केले आहे. एका इंग्रजी वृत्तापत्रातील मुलाखतीत तिला सिनेमाच्या मानधनाव्यतिरीक्त चार कोटी रुपये दिल्याचे विचारण्यात आले.
याविषयी रिंकू म्हणाली, आम्हाला मानधनापेक्षा अधिक चार कोटी रुपये दिल्याचे वृत्त खोटे आहे. सिनेमासाठी जे मानधन ठरवण्यात आले होते तितकेच पैसे आम्हाला मिळाले. मुळात, पैशांचे इतके मोठे व्यवहार करण्यासाठी मी अजून लहान आहे. त्यामुळे माझे पालक या सर्व गोष्टींकडे लक्ष देतात. मी फक्त माझ्या दहावीच्या अभ्यासासाठी पुस्तक विकत घेण्याचे काम करणार. माझ्यासाठी माझे काम आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

पुढे वाचा, रिंकूने आईच्या हातची पुरणपोळी आणि वांग्याची भाजी खाण्यासाठी धरली घरची वाट...