आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागराज मंजुळेंचं Confession, ‘मला होतोय पश्चात्ताप’, कसला? वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठीत सुपरडूपर हिट झालेली सैराट आता साऊथ इंडियन भाषांमध्येही बनणार आहे. सॅंडलउडचे सुप्रसिध्द निर्माते रॉकलाइन व्यंकटेश ह्या सिनेमांची निर्मिती करणार आहेत. पहिल्यांदा तेलगुमध्ये ही फिल्म बनल्यावर मग कन्नड, तमिल, मल्यालममध्येही बनणार आहे.
मराठी दिग्दर्शकासाठी ह्या भाषा खरं तर समजायला अवघड. अशावेळी नागराज आता साऊथ सिनेमाचं आव्हान कसं स्विकारणार, असं विचारल्यावर नागराज म्हणतात, “तेलगु ही माझी खरं तर मातृभाषा. आणि ही गोष्ट महाराष्ट्रीयन लोकांना माहित नाहीये. ह्याचं कारणं ह्या भाषेत मी कधीच कोणाशी संवाद साधलेला नाहीय. माझ्या आई-वडिलांची भाषा तेलगु आहे. पण लहानपणी मला तेलगु भाषेचा खूप क़ॉम्पलेक्स होता. ही भाषा तुच्छ आहे. ही भाषा बोलणारे लोकं तुच्छ आहेत, असं वाटायचं. आणि स्वत:च्या मातृभाषेचा न्युनगंड बाळगुनच मग मराठी बोलू लागलो.”
“तेलगु समजायचं. पण मुद्दामहूनच संभाषण करायचो नाही. हळूहळू ह्या भाषेपासून दूरावत गेलो. आजही घरात माझे आई-वडिल आणि भाऊ एकमेकांशी बोलतात. पण आता मला बोलताच येत नाही. आता मोठं झाल्यावर ह्याचा मला पश्चात्ताप होतोय. आत्ता ह्या सिनेमाच्या निमीत्ताने तेलगुची पून्हा एकदा उजळणी होईल. आणि कदाचित ही फिल्म केल्यावर मी तेलगु चांगली बोलू लागेन.”
आता नवीन तेलगु सिनेमात काय काय असणार असं विचारल्यावर नागराज म्हणतात, “पून्हा नवीन जोडी ह्या सिनेमात दिसेल. त्यासाठी कलाकारांची निवड लवकरच सुरू होईल. सैराट सिनेमाचं संगीत ही त्या सिनेमाचं शक्तिस्थान असल्याने सगळीच गाणी नवीन सैराटमध्येही असणार आहेत. मात्र कदाचित कथानकात थोडाफार बदल होईल. कारण एकंच भाजी आपल्याला पून्हा बनवायला सांगितली तर पून्हा बनवताना आपण तसंच बनवत नाही. त्यात काहीतरी वेगळेपण असतंच. तसंच पून्हा सिनेमा बनवताना कथानकात थोडेफार बदल होतील.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सैराट चित्रपटाच्या सेटवरचे फोटो
बातम्या आणखी आहेत...