आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Was Anxious To Perform Sensuous Dance Number, Says Sanskruti Balgude

Sensuous dance करताना फजिती होण्याची भीती वाटत होती - संस्कृती बालगुडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी गौरव अवॉर्ड फंक्शनमध्ये क्युट एक्टरेस संस्कृती बालगुडेने ‘हेट स्टोरी-३’ मधल्या ‘ तू इस्क मेरा’ ह्या सेन्शुअस आणि हॉट डान्स नंबरवर परफॉर्मन्स दिलाय. स्टेजवर आल्यावर आपल्या मधाळ हास्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी संस्कृती मात्र बॅकस्टेजला प्रचंड घाबरलेली दिसत होती.
परफॉर्मन्स झाल्यावर संस्कृती बालगुडे थोडी स्थिरावली. तिला परफॉर्मन्स अगोदर नक्की काय झालं होतं, असं विचारल्यावर ती म्हणाली, “परीक्षेच्या अगोदर जसं टेन्शन येतं, तसं मला नेहमी स्टेज परफॉर्मन्सवेळी टेन्शन येतंच. मला कोणी बघू नका, कोणी माझ्याशी बोलू नका, अशी काहीतरी विचीत्र अवस्था झालेली असते. मी त्या टेन्शनमध्ये रडते सुध्दा. पण नशीबाने ह्यावेळी मी सर्वांसमोर रडले नाही. आणि व्यवस्थित परफॉर्मन्स दिला.”
संस्कृती तिच्या सेन्शुअस परफॉर्मन्ससाठी इजिप्तशिअन प्रिंसेस बनली होती. ती आपल्या कॉस्च्युम्सबद्दल म्हणाली, “अभिजीत ठाकूर आणि दिपा ठाकूर ह्यांनी कॉस्च्युम केला होता. सुरूवातीला तो गाऊन स्वरूपाचा होता. पण डान्स स्टेप्सच्या दृष्टीने तो गाऊन खूप अडचणीचा होता. त्यामुळे मग त्या गाऊनला मधून कट करून आत लेगिन्स अशा स्वरूपाचा ड्रेस डिझाइन करण्यात आला. पायात मोठे बूट घातल्यासारखं वाटावं, असं डिझाइन गुडघ्याखाली लेगिन्सना देण्यात आलं. त्यामुळे तो छान वाटत होता. पण हे सगळं झाल्यावर डोक्यावर देण्यात आलेला मुकूट खूप आडचणीचा वाटू लागला. तो क्राउन घालून नाचणं कितपत शक्य होईल. मी नाचता-नाचता तो मुकट उडला तर किंवा तो पडला तर ह्याचीच मला जास्त भीती वाटत होती.”
संस्कृतीच्या ह्या भीतीमूळेच परफॉर्मन्स अगोदर संस्कृतीच्या पोटात अक्षरश: गोळा आला होता. एरवी सतत हसत असणारी बबली संस्कृती बालगुडेची एकदम बोलती बंद झाल्यासारखी अवस्था झाली होती. खरं तर, बॅकस्टेज आर्टिस्ट पासून ते अगदी सेलिब्रिटी सगळेच तिला तिच्या मेकअप आणि कॉस्च्युमसाठी कॉम्पलिमेन्ट देत होते. पण संस्कृती मात्र कोणाशी जास्त बोलायच्या मनस्थितीच नव्हती.
ती सांगते, “इजिप्तशिअन प्रिंसेस बनण्यासाठी वेगळा कॉस्च्युम, वेगळा आयलायनर, इथपासून ते अगदी मला डस्की टोन देण्यापर्यंत एवढं सगळं जवळ-जवळ दोन-अडीच तास तयार व्हायला वेळ घेऊन त्या एका गाण्याच्या परफॉर्मन्ससाठी मी नखशिखांत नटले होते. आणि मग जेव्हा बॅकस्टेजला आले, तेव्हा भीती वाटू लागली होती. आधीच थीमपासून, डान्समुव्ह्ज पासून सगळं वेगळ असताना कॉस्च्युम सांभाळण्याचं वेगळं टेन्शन ह्या सगळ्याच्या टेन्शनने मला आता सगळ्यांसमोर रडू फुटणार की काय ह्याची भीती वाटू लागली होती. पण जेव्हा परफॉर्मन्स झाला, तेव्हा टाळ्यांच्या क़डकडाटाने सगळं टेन्शन एका क्षणात छू झालं.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हॉट संस्कृती बालगुडेचा सेन्शुअस डान्स परफॉर्मन्स