आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्ती बर्वे,प्रिया तेंडुलकर,सुकन्या कुलकर्णी,अमृता सुभाषनंतर आली पाचवी ‘फुलराणी’ हेमांगी कवी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पु.ल.देशपांडे लिखीत ती फुलराणी नाटक प्रत्येक पिढीतल्या नाट्य दिग्दर्शक आमि निर्मात्याला भुरळ घालत आलंय. प्रत्येक दशकात हे नाटक रंगभूमीवर आलंय. नाट्य दिग्दर्शक राजेश देशपांडे सध्या हे नाटक रंगभूमीवर घेऊन आलेत. ह्या नाटकात हेमांगी कवी ‘फुलराणी मंजु’च्या भुमिकेत आहे, तर प्राध्यपक अशोकरावांच्या भुमिकेत डॉ.गिरीश ओक आहेत.
आत्तापर्यंत भक्ती बर्वे-सतीश दुभाषी, प्रिया तेंडुलकर-सदाशिव अमरापुरकर, सुकन्या कुलकर्णी-संजय मोने, अमृता सुभाष-अविनाश नारकर ह्या चार जोड्यांनी हे नाटक अविस्मरणीय केलंय. आता हेमांगी कवी-डॉ. गिरीश ओक ही जोडी पाचव्यांदा हे नाटक रंगभूमीवर साकारतेय. विशेष म्हणजे डॉ. गिरीश ओक ह्या नाटकाचे खूप पूर्वीपासून चाहते होते. त्यांनी प्रत्येक पिढीच्या ‘ती फुलराणी’ नाटकाचा रसास्वाद घेतलाय. ते सांगतात, “भक्ती बर्वे- सतीश दुभाषींचं नाटक मी पाहिलं नाही. त्याचा मी ऑडियो ऐकलाय. बाकी सर्व जोड्यांची रंगभूमीवरची ‘ती फुलराणी’ मी पाहिलीय. तेव्हा माहित नव्हतं, की, एक दिवस हे नाटक आपणही रंगभूमीवर साकारणार आहोत. आत्तापर्यंत नाटक पाहताना, आणि वाचताना खूप सोप्पं वाटलं होतं. पण करायला लागल्यावर ते कठीण असल्याचं जाणवतंय.”
मूळ तीन अंकी असलेलं हे नाटक आता दोन अंकी झालंय. दिग्दर्शक राजेश देशपांडे नाटकाविषयी सांगतात, “मी ह्याअगोदरचं एकही नाटक पाहिलं नाही. कारण मला इतर कोणाही दिग्दर्शकाच्या शैलीचा माझ्यावर परिणाम नको होता. ह्यासोबतच पूर्वी तीन अंकी नाटक असण्याची पध्दत होती. आता काळानुरूप एवढा वेळ प्रेक्षकांकडे नसतो. ह्याशिवायही नाटक सादर करतानाही इतर अडचणी असतात. त्यामुळे नाटक दोन अंकी करण्यात आलं. निर्मात्यानी जेव्हा हे रंगभूमीवर आणायचं ठरवलं तेव्हा मी हेमांगीची ह्यासाठी निवड केली, कारण मला तिची अभिनय क्षमता आणि शैली ह्याविषयीची माहिती होती. ती एकाचवेळी गावरान आणि मॉडर्न वाटू शकते, आणि बोलू-वागूही शकते. हे मला ठावूक होतं.”
हेमांगी कवी आपल्या भूमिकेविषयी सांगते, “माझ्या अगोदर व्यावसायिक रंगभूमीवर ज्या-ज्या अभिनेत्रींनी फुलराणी साकारली, त्यातल्या प्रत्येकीची फुलराणी ही अविस्मरणीय होती. त्यामुळे अर्थातच ही अजरामर भुमिका रंगवताना माझ्यावर दडपण आहे. पण मी ह्यातली एकही फुलराणी पाहिलीच नाही. त्यामुळे मी संपूर्णपणे माझ्या शैलीतली फुलराणी रंगवू शकले.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ती फुलराणी नाटकाचे फोटो
(फोटा - स्वप्निल चव्हाण)
बातम्या आणखी आहेत...