आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही मराठमोळी मुलगी ठरली \'मिस टीन ब्रॉम्पटन\' 2017, भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडा येथे झालेल्या मिस टीन ब्रॉम्पटन स्पर्धेत मुळची भारतीय असलेली निकीता पाटीलने सातासमुद्रापार विजयाचा झेडा फडकवला आहे. निकीताचे वडील राहुल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील कुटुंबीय हे गेल्या 15 वर्षापासून कॅनडा येथे वास्तव्यास आहेत. मुळचे पुण्याचे असलेल्या राहुल यांनी निकीताच्या या यशाची माहिती आमच्या प्रतिनीधीसोबत शेअर केली आहे. 

 

निकीताच्या या यशाने कॅनडा येथील भारतीयांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. निकीता एक उत्तम जलतरणपटूही आहे. या यशाबद्दल निकीता सांगते की, "Teen Miss Brampton Flower City 2017-2018 स्पर्धेत ब्राम्पटोनचे प्रतिनीधीत्व करणे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. माझ्या सिटीच्या विकासासाठी माझ्या परीने मी हातभार लावण्याचा प्रयत्न करेन." 

 

"मी आज जे काही कमवू शकले त्यात फार मोठा वाटा माझ्या स्विमींगचा आहे. नुकतीच मी स्वीम इंस्ट्रक्टरही बनली आहे आणि मला आनंद होते की मी माझ्याजवळील स्विमींगचे ज्ञान लोकांना देऊ शकते." 

 

"माझ्या जीवनात माझे कुटुंब आणि परंपरा यांना फार जास्त महत्त्व आहे. तुम्ही कुठेही असाल तरी तुमच्या परंपरांशी जुळून राहणे यांसारखी मोठी गोष्ट नाही. आता मिस ब्रॉम्पटोन बनल्यानंतर मी काही चॅरीटेबल ट्रस्टसोबत तसेच माझ्या शहरातील साऊथ एशिअन कम्युनिटीसे प्रतिनीधीत्व करण्याची माझी इच्छा आहे."

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, निकीता पाटीलचे काही खास PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...