आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडस हेल्थ प्लसतर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाच्या सदस्यांना मोफत आरोग्य तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इंडस हेल्थ प्लस या प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा कंपनीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांसाठी मुंबईत मोफत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा तापसण्या केल्या. या शिबिराचे उद्धाटन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
या शिबिराचे उद्दीष्ट हे त्यांना त्यांच्या आरोग्याबाबत जाणीव जागृत करुण देणे आणि त्यांना निरोगी जीवनशैली तसेच नियमित तपासण्यांसाठी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देण्याचे आहे. या आरोग्य शिबिराची सुरुवात महाराष्ट्र कला अकादमी, पु. ल. देशपांडे सभागृह प्रभादेवी येथे सकाळी 9 वाजता करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण फिटनेस चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये सिरम बिलिरुबीन, सिरम क्रिएटिनाइन, ग्लायकोसायलेटेड, हिमोग्लोबिन, सर्वसाधारण संपूर्ण कोलेस्ट्रॉल, एमआय पल्मनरी फंक्शन टेस्ट अशा चाचण्यांचा सामावेश होता. आरोग्य तपासणीनंतर आहार सल्लाही पोषण तज्ञांकडून देण्यात आला.
या मोहिमेचा भाग म्हणून अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, कॅमेरामन, तंत्रज्ञ यांच्यासारख्या 200 व्यक्तींनी या प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीव्दारे प्रतिबंधात्मक मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला. या शिबिरात ख्यातनाम कलाकार विक्रम गोखले आणि किशोरी शहाणे, अलका आठवले, प्रिया बेर्डे, दीपाली सय्यद, पंढरीनाथ कांबळेसारख्या दिग्गज कलाकरांचा सामावेश होता.
डॉ. अमोल नायकवडी, सह-व्यवस्थापकीय संचालक आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा तज्ञ, इंडस हेल्थ प्लस म्हणाले, 'मनोरंजन उद्योगाशी संबंधित लोकांची त्यांच्या अनियमित जीवशैली आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असते अशा प्रतिबंधात्मक आरोग्य शिबिरांमध्ये वेळेत निदान केल्यामुळे त्यांना त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेता येतात. आमच्याकडे तज्ञ डॉक्टर्स आणि क्लिनिशियन्स आहेत, जे तपासणी आणि चाचण्यांदरम्यान अचूकता प्राप्त करतात.'

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शिबिरात सामील झालेल्या कलाकांचे फोटो...