आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : अतुल मोठा तरीही नावात अजय पुढे, वाचा अजय-अतुल यांचे Unknown Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजय-अतुल हे नाव ऐकले की आपल्या डोळ्यांसमोर अनेक गाजलेल्या गाण्यांची यादी उभी राहते. महाराष्ट्रातील लोकसंगीत ज्याप्रकारे या दोघांनी चित्रपटाच्या मातीतून मनामनात रुजवले तसे आजवर संगीतकारांना जमले नाही. या दोघांनी मराठीबरोबरच हिंदीतही यशाची पताका फडकावली. अगदी शून्यातून सुरुवात करत संगीत क्षेत्रात साम्राज्य निर्माण करण्याचे काम अजय अतुल यांनी केले आहे. अजय आणि अतुल यांच्यातील अजय गोगावले यांचा आज (21 ऑगस्ट) वाढदिवस असून त्यांनी वयाची 41 वर्षे पूर्ण केली आहेत. Exclusive :  पहिल्यांदाच बघा मराठमोळ्या अजय-अतुलच्या आलिशान घराचे Inside Photos
 
अजय आहेत धाकटे... 
अजय-अतुल यांच्यात अतुल हे थोरले तर अजय हे धाकटे आहेत. 21 ऑगस्ट 1976 रोजी पुण्यात अजय यांचा जन्म झाला. तर थोरले अतुल यांचा जन्म 11 सप्टेंबर 1974 रोजी झाला.  दोघांच्या वयात दोन वर्षांचे अंतर आहे.
 
अजय यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही अजय-अतुलच्या आजवरच्या प्रवासाबाबत तुम्हाला सांगणार आहोत. लहानपणापासूनच या दोघांची कारकिर्द एकमेकांसोबत राहिलेली आहे, त्यामुळे वाढदिवस अजयचा असला तरी आपण आज दोघांच्या कारकिर्दीबाबत जाणार आहोत. अजय-अतुल यांनी त्यांच्या नावात आधी अजय ठेवले आहे. त्यामागेही संगीताशी जुळलेलेच कारण आहे.
 
जाणून घेऊयात काय आहे हे कारण आणि यासह बरंच काही पुढील स्लाइड्सवर..
बातम्या आणखी आहेत...