आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: मराठमोळ्या राधिकाची बिनधास्त वक्तव्ये, म्हणते, शरीर दाखवण्यात कसली आली लाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2005 साली 'वाह लाइफ हो तो ऐसी' या सिनेमात छोटेखानी भूमिकेद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणारी राधिका हिचा 7 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. 7 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात जन्मलेली राधिका वयाची 32 वर्षे पूर्ण करणार आहे. द वेटिंग रुम, रक्तचरित्र, शोर इन द सिटी, बदलापूर, हंटर, लायन, मांझी द माऊंटन मॅन, पार्च्ड, फोबिया, कबाली यांसह अनेक गाजलेल्या हिंदी आणि साऊथच्या सिनेमांत काम करणारी राधिका मराठी इंडस्ट्रीतसुद्धा अॅक्टिव आहे. मराठीत तिने घो मला असला हवा, समांतर, तुकाराम, पोस्टकार्ड, लय भारी या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 

खरं तर अभिनेत्री राधिका आपटे आणि बोल्ड सीन हे जणू आता समीकरणच तिच्या चित्रपटांबाबत बनले आहे. चित्रपट तयार करताना राधिकची भूमिका असेल तर तिचा एक तरी बोल्ड सीन असेल याची काळजी घेतली जाते, असे पाहायला मिळाले आहे. कारण तिच्या दमदार भूमिकेबरोबरच तिचा बोल्ड अंदाज हा चाहत्यांना घायाळ करणारा असतो. चित्रपटांमध्ये बोल्ड सीन देणारी राधिका विचारांनीही तेवढची बोल्ड आणि रोखठोक आहे. काही दिवसांपूर्वी एका वेबसाईटला तिने दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्यांवरून हे समोर आले आहे. तिच्या 'पार्च्ड' या चित्रपटातील इंटिमेट सीन्सची बरीच चर्चा झाली होती. सेन्सॉरने हे सीन ब्लर केल्यानेदेखील त्यावर चर्चा सुरू होती. या विषयावर बोलताना राधिकाने मात्र तिची मते अगदी थेट आणि स्पष्टपणे मांडली होती. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, राधिकाने व्यक्त केलेली बिनधास्त मतं...
बातम्या आणखी आहेत...