आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 Facts: पहिले पती गणपतराव भोसले करायचे आशा भोसलेंना मारहाण, वयाने होते 15 वर्षांनी मोेठे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुसरे पती आर.डी बर्मन यांच्यासोबत आशा भोसले - Divya Marathi
दुसरे पती आर.डी बर्मन यांच्यासोबत आशा भोसले
आशा भोसले हे नाव माहीत नसलेला संगीतप्रेमी सापडणे अवघडच. गेली अनेक वर्षे सुरेल आवाजाने कानसेनांना आनंद देणारी आणि शास्त्रीय तसेच पाश्चिमात्य शैलीची गाणी लिलया गाणारी ‘मेलोडी क्वीन’ म्हणून आशाताईंना ओळखले जाते. आज आशाताईंचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 84 वर्षे पूर्ण केली आहेत. 8 ऑगस्ट 1933 रोजी सांगली, महाराष्ट्र येथे त्यांचा जन्म झाला. आशा भोसले यांच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्यांचे पहिले लग्न अपयशी ठरले होते. 

सहा वर्षांनी लहान आर.डी.बर्मनसोबत केले होते दुसरे लग्न...
- आशा भोसले यांनी 1980 साली आर.डी.बर्मन यांच्यासोबत लग्न केले होते. आशा आणि त्यांच्या वयात सहा वर्षांचे अंतर होते. ते आशा यांच्यापेक्षा लहान होते. पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर आशाताईंनी आर.डी.बर्मन यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते.
- त्यांचे दुसरे लग्न यशस्वी ठरले होते. आर. डी. बर्मन यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आशा भोसले त्यांच्यासोबत होत्या. 
- आशा भोसले यांनी वयाच्या 16 व्या वर्षी त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाच्या गणपतराव भोसलेंसोबत लग्न केले होते. गणपतराव भोसले हे लता मंगेशकर यांचे पीए होते. कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन आशाताईंनी त्यांच्यासोबत लग्न केले होते. 
- लग्नाच्या काही दिवसांतच गणपतराव भोसले आशा भोसले यांना त्रास देऊ लागले. ते आशा यांना मारहाण करायचे आणि माहेरच्या मंडळींना भेट देत नसतं. 
- गणपतराव भोसले यांच्यासोबतचे संबंध अधिकच बिघडल्याने आशा भोसले यांनी त्यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि 1960 साली त्यांच्या दोन मुलांना घेऊन माहेरी निघून आल्या होत्या. जेव्हा आशा भोसले यांनी गणपतराव भोसलेंचे घर सोडले तेव्हा त्या तिस-यांदा प्रेग्नेंट होत्या. 

पुढे वाचा, आशा भोसले यांच्या आयुष्याशी निगडीत आणखी काही खास गोष्टी...   
बातम्या आणखी आहेत...