देशभरात 15 सप्टेंबर हा दिवस ‘अभियंता दिवस’ (इंजिनिअर्स डे) म्हणून साजरा केला जातो. भारतातील पहिले अभियंता सर मोक्षगुडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिवस. भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेले विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस साजरा केला जातो. आज इंजिनिअर्स डेचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला सांगतोय, मुळचे इंजिनिअर असलेले पण आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर मराठी छोटा आणि मोठा पडदा गाजवणा-या अभिनेत्यांविषयी.
मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही इंडस्ट्रीत चमकरणारे अनेक नावाजलेले अभिनेते इंजिनिअर्स असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? खरं तर यापूर्वीपर्यंत डॉक्टर अभिनेते बनल्याची खूप उदाहरणे इंडस्ट्रीत बघायला मिळाली. पण आता मूळचे इंजिनीअर असलेले अनेक कलाकार छोट्या आणि मोठ्या पडद्यावर चमकताना दिसतायत. आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर या कलाकारांनी अभिनय क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. या यादीत अनेक नावाजलेल्या अभिनेत्यांच्या नावाचा समावेश आहे.
चला तर मग कोणकोणते अभिनेते इंजिनिअर आहेत, ते जाणून घेऊयात...