एंटरटेनमेंट डेस्क - महेश वामन मांजरेकर हे नावही ऐकले तरी मराठीतील 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'काकस्पर्श', 'नटसम्राट' अशा एकापेक्षा एक सरस चित्रपट डोळ्यासमोर येतात. महेश मांजरेकर यांच्या करिअरवर नजर टाकता त्यांनी सिनेइडस्ट्रीतील प्रत्येक क्षेत्रात काम केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अभिनयापासून ते डायरेक्शन, निर्मिती, संकलन, गायन सगळीकडे त्यांनी वावर केला आहे. इव्हेंटमध्येही त्यांचे भरपूर काम आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक कामे करणारा कलावंत अशी ओळखच महेश मांजरेकर यांची बनली आहे.
महेश मांजरेकर यांचा सिने इंडस्ट्रीतील प्रवास हा अत्यंत रंजक आणि तेवढाच प्रेरणादायी आहे. एखाद्या क्षेत्रात यश मिळत असतानाही, दुसऱ्या क्षेत्रात आपल्याला काम जमते का याचा ते कायम अंदाज घेत राहिले. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात त्यांची उपस्थिती कायम जाणवत राहिली. मराठी कलाकार असूनही महेश यांनी हिंदीत मोठे नाव कमावले आणि हिंदी मोठे झाल्यानंतर मराठीत एकापेक्षा एक सरस कलाकृती तयार केल्या हे महेश यांचे वैशिष्टय. त्यांच्या याच वैशिष्ट्यपूर्ण जीवनाचा आढावा आपण आज घेणार आहोत. महेश मांजरेकर यांनी वयाची 58 वर्षे पूर्ण केली आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, महेश मांजरेकर यांच्या जीवनाविषयी..