आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Educational Qualification : प्रिया आहे जर्नलिस्ट, सईसह या 16 अॅक्ट्रेसेससुद्धा आहेत उच्चशिक्षित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक नाव म्हणजे प्रिया बापट. नुकताच प्रियाने तिचा 31 वा वाढदिवस साजरा केला. 18 सप्टेंबर 1986 रोजी मुंबईत जन्मलेली प्रिया बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. सहावीत शिकत असताना तिचा पहिला चित्रपट रिलीज झआला होता. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटात लहानपणीच्या 'माईसाहेबांच्या' भूमिकेत ती झळकली होती. विशेष म्हणजे अभिनेत्रीसोबतच ती एक चांगली गायिकासुद्धा आहे. बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात अॅक्टिव असलेल्या प्रियाने अभ्यासाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. दहावीच्या परिक्षेच्या आदल्यादिवशीपर्यंत तिने नाशिकमध्ये चंद्रकांत कुलकर्णींच्या भेट या चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. दहावीत शूटिंग आणि अभ्यासात ताळमेळ साधत प्रियाने 78 टक्के गुण मिळवले होते. 

जर्नलिस्ट आहे प्रिया...
अकराव्या वर्गात शिकत असताना प्रियाला तिचा पहिला हिंदी चित्रपट मिळाला होता. संजय दत्तसोबत मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात काम करण्याची संधी तिला मिळाली होती. तर बारावीत असताना तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. 'सन सिल्क' ,'मिल्क अँड रोझेस', 'तीन सुप्रीम ','हीरो होंडा' ,'सिने मेक्स', 'पास पास' अशा अनेक जाहिरातींमध्ये तिने काम केले. मॉडेलिंग, मालिका, चित्रपट करत-करत प्रियाने अर्थशास्त्रात बी.ए. पूर्ण केले. पुढे तिने मास कम्युनिकेशन विषयातसुद्धा पदवीप्राप्त केली. अभिनेत्री नसते तर नेव्ही, कॉर्पोरेट सेक्टर, जाहिरात क्षेत्र किंवा कॅमेराच्या पाठीमागे असे कशात तरी मी काम केलेच असते, असे प्रिया सांगते. 
 
प्रियाप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रींनीही अभिनय क्षेत्रात नाव कमावण्यापूर्वी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. सई ताम्हणकर, स्पृहा जोशी, मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी, सुरुची अडारकर, दीप्ती श्रीकांत, मृणाल दुसानिस, अमृता खानविलकर यांसह अनेक जणी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहे. या सर्वजणींनी आपल्या आवडत्या विषयात शिक्षण पूर्ण केले आणि नंतर आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला.

आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मराठीतील या लिडिंग अॅक्ट्रेसेस किती शिकल्या आहेत, हे सांगत आहोत.
बातम्या आणखी आहेत...