आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी इंडस्ट्रीतील इन्स्टाग्राम क्वीन आहे ग्लॅमरस प्रिया, या 10 अॅक्ट्रेसेपेक्षा अधिक आहेत फॉलोअर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात राहण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे मराठी सेलिब्रिटीसुद्धा सोशल नेटवर्किंग साईट्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून हे सेलिब्रिटी आपल्या सिनेमांबद्दलची तर कधी कधी आपल्या खासगी आयुष्यासंबंधीची गोष्टही आपल्या चाहत्यांना सांगतात. किंबहूना या सोशल साईट्स म्हणजे सेलिब्रिटींसाठी पब्लिसिटी मिळवण्याचा साधासोपा मार्गच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
 
चाहतेसुद्धा या सेलिब्रिटींना ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून फॉलो करत असतात. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्सवरील सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सच्या संख्येवर एक नजर टाकली असता, या सेलिब्रिटींची लोकप्रियता किती आहे, हे आपल्या लक्षात येईल.

आता हेच बघा ना, मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट हिचे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर तब्बल आठ लाखांहून अधिक म्हणजे 862k फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे प्रियाने मराठीतील नावाजलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडीत, मानसी नाईक, उर्मिला कानिटकर-कोठारे, तेजश्री प्रधान, श्रुती मराठे, नटरंग फेम सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर यांना मागे टाकले आहे. 

प्रिया सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव आहे. ती नित्यनेमाने पती उमेश कामतसोबतचे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. याशिवाय तिचे ग्लॅमरस लूकमधील विविध फोटोज यावर बघायला मिळतात. प्रियाने 18 सप्टेंबर रोजी वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत.  
 
चला तर मग इन्स्टाग्रामवर प्रियानंतर सर्वाधिक फॉलोअर्स कुणाचे आहेत, हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...