पुणे - दहावीचा निकाल आज (13 जून) जाहिर झाला आहे. 'सैराट' या सिनेमातून एका रात्रीत सुपरस्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु हिनेदेखील याचवर्षी दहावीची परीक्षा दिली. त्यामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या आर्चीला दहावीत किती टक्के गुण मिळणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिंकूने दहावीत फर्स्ट क्लास मिळवला आहे. पण तिला नेमके किती टक्के गुण मिळाले, हे अद्याप जाहिर झालेले नाही. पण नववीच्या तुलनेत तिचा निकाल घरसल्याची चर्चा आहे. रिंकूला नववीत 81 टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे दहावीतदेखील ती कौतुकास्पद कामगिरी करेल, असे सर्वांना वाटले होते. पण फर्स्ट क्लास मिळवून देखील रिंकू नववीच्या तुलनेत यंदा टक्केवारीत कमी पडली आहे.
मुलीच हुशारss दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 88.74 टक्के, कोकण अव्वल.. नागपूर तळाला
दोन महिन्यांत पूर्ण केला होता अभ्यास...मागील वर्षी एप्रिल महिन्यात रिंकूचा सैराट हा सिनेमा रिलीज झाला होता. सैराटला मिळालेल्या तुफान यशानंतर 'सैराट'च्या कन्नड रिमेकमध्ये रिंकूने मुख्य भूमिका साकारली. ‘मनसु मल्लिगे’ नावाने रिंकूचा कन्नड सिनेमा रिलीज झाला. मागील वर्षी दिवाळीच्या काळात सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले होते. रिंकूने शूटिंगसोबतच अभ्यासाकडेही लक्ष दिले. शूटिंग संपल्यानंतर केवळ दोन महिन्यांत तिने दहावीचा पूर्ण अभ्यासक्रम संपवला.
विदाउट मेकअप कशा दिसतात 'आर्ची'सह मराठीतील फेमस अॅक्ट्रेसेस, 27 PICS मध्ये पाहा खरे रुप
मराठीत सांगितलेलं कळतं नाही ? इंग्लिशमध्ये सांगू... असं म्हणणा-या 'आर्ची'ला अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला दहावीत इंग्रजी विषयात किती गुण मिळाले, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईडवर...