आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिध्दार्थ-स्पृहाच्या Intro Teaserला ५ दिवसात १ लाख ४० हजार views

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Intro teaser ही कॉन्सेप्ट मराठी सिनेसृष्टीसाठी थोडी नवीन आहे. हॉलीवूड, बॉलीवूड आणि वल्ड सिनेमामध्ये चित्रपटाचा टिझर लाँच होण्याअगोदर सिनेमाच्या कथानकाविषयी उत्सुकता जागवण्यासाठी इंट्रो-टिझर लाँच होतात. आता सिध्दार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशीच्या Lost &Found ह्या मराठी सिनेमासाठी असा Intro teaser नुकताच लाँच करण्यात आलाय.
ही कॉन्स्पेप्ट नवीन असल्यामूळे किंवा आवडल्यामूळे पाच दिवसातच ह्या टिझरला जवळजवळ दिड लाख व्ह्युज मिळाले. त्यामूळे सध्या Lost &Foundची टीम ह्या नव्या कॉन्सेप्टच्या यशामूळे खुशीत आहे.
ह्याविषयी अभिनेत्री स्पृहा जोशी divyamarathi.comशी बोलते, “साधारणपणे सिनेमाचा फस्ट ट्रेलर लाँच हा सिनेमातल्या संवादाचा आणि घटनांचा एक कोलाज असतो. पण आमचा दिग्दर्शक ऋतुराज धालगडेला असं वाटलं की, सिनेमातले डायलॉग किंवा सीन न घेता एक टिझर पूर्णपणे वेगळा चित्रीत करावा. सिनेमाची वनलाइन कथा सांगणारा हा टिझर त्याने आणला. सुरूवातीला ह्याने काय होईल असं आम्हांला वाटतं होतं. पूर्णपणे वेगळा टिझर चित्रीत करायची गरज आहे का? एवढं करून लोकांना तो आवडेल का? असं वाटत असतानाच, लोकांनी टिझरला भरभरून प्रतिसाद दिला. तेव्हा कुठे त्यातलं वेगळेपणं आमच्याही लक्षात आलं.”
ती पूढे म्हणते, “सिध्दार्थ चांदेकर आणि मी अगिनहोत्र मालिका एकत्र केली होती. पण त्या मालिकेत आम्ही बहिण-भावाच्या भूमिकेत होतो. त्यानंतर इतक्या वर्षांनी पून्हा एकत्र आलोयत. पण ह्यावेळी सिनेमाचे हिरो-हिरोइन आहोत. आम्हांला ही कथा खूप इंटरेस्टिंग वाटली, त्यामुळे आम्ही ही फिल्म केली.”
सिनेमाला शुभंकर शेंबेकरने संगीत दिलंय, त्यानेच सिनेमाच्या ह्या इंट्रो टिझरला संगीत दिलंय.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सिनेमाचा intro teaser आणि फोटो
बातम्या आणखी आहेत...