आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Celebrity Home : Inside Glimpse Of Singer Neha Rajpal’S Lavish Home

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Celebrity Home : गायिका नेहा राजपालसाठी तिचं पवईचं घर म्हणजे ‘ड्रीमहोम’, पाहा Pix

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुंबईतील आपल्या घरात गायिका नेहा राजपाल)
मुंबईः मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका नेहा राजपालसाठी तिचं पवईचं घर म्हणजे ‘ड्रीमहोम’ आहे. ती सांगतेय, तिच्या घराचं वैशिष्ट्य...
मोकळी हवा, नैसर्गिक सुर्यप्रकाश हे माझ्या घराचे सगळ्यात महत्वाचे निकष आहेत आणि मुंबईसारख्या ठिकाणी या दोन गोष्टी तुमचं घर जर टॉप फ्लोअरवर असेल, तरच मिळतात. त्यामुळे मी घर तसंच सिलेक्ट करते. आत्ताचं माझं हे घरसुध्दा आमच्या बिल्डींगमधल्या सगळ्यात वरच्या मजल्यावर म्हणजचे 25 व्या मजल्यावर असण्याचंही हेच कारण आहे. माझं आत्ताचं घर हे, माझं ड्रीम होमच म्हणायला हवं. एक तरं माझं माहेर आहे, डोंबिवली आणि सासर वाशी आहे. दोन्हीकडून समान अंतरावर माझं हे घर आहे. त्यात मुंबईतल्या सर्वात उंचभागी माझं घर असल्याने मला मी हिलस्टेशनवर राहिल्याचाच भास होतो. एवढं अल्हाददायक वातावरण नेहमी माझ्या घरी असते. माझ्या एका खिडकीतून मला वाशी ऐरोली पर्यंतची मुंबई पाहता येते. तर दुस-या बाजूनं अंधेरीपर्यंतचा भाग दिसतो. लिफ्टमधनं बाहेर पडलात तर पवईलेकचा परिसर दिसतो. त्यामुळे निसर्गरम्य आणि मुंबईच्या मध्यभागी घर असल्याने मुंबईचं फास्ट लाइफ घराखाली उतरताच अनुभवते. तर घरात हवी असलेली शांतताही मिळते.
माझ्या घरी उन्हाळ्यातही भरपूर खेळती हवा असते आणि पावसाळ्यात खिडकीत बसून मुंबई अनुभवण्याची मजा काही न्यारीच असते. घराला साऊंडप्रुफ तावदानं बसवली आहेत. त्यामुळे बाहेरचा आवाज नको असेल, तर एकदम टाचणी पडली तरी आवाज यावा अशी शांतताही अनुभवता येते. माझ्या पुढील चित्रपटाचं म्युझिक तर आमच्या घरात बसूनच कम्पोज झालंय.
माझ्या बेडरूमच्या एका खिडकीतून सुर्योदय तर दुस-या खिडकीतून सुर्यास्त अनुभवता येतो.
माझ्या खिडकीत सकाळी सकाळी दोन तीन पोपट आणि एक-दोन मैना, कधी कोकिळा आणि कधी चिमण्यासुध्दा येतात. मी उठतेच त्यांच्या आवाजाने आणि मग निसर्गाच्या साथीने माझा एक तास रियाज सुरू होतो. एका कलाकारासाठी निसर्गाच्याजवळ राहणं, खूप महत्वाचं असतं. आणि ते मुंबईत राहून सगळ्यांनाच अनुभवता येत नाही. पण हिच तर गंमत आहे, या घराची.
मला आणि माझ्या नव-याला आकाशला घर सजवण्याची खूप हौस आहे. आणि हे आमचं घर आम्ही इंटिरिअर डेकोरेटरच्या हातात न देता स्वत:च विचारपूर्वक सजवलंय. डायनिंग टेबलच्या पाठची भिंत तर मीच रंगवलीय.
माझ्या ड्रॉईंगरूममध्ये आठ गणपतींची एक सुंदर शिल्पकृती आहे. ती किंवा माझ्या शु-रॅकच्यावर असलेली मधुबनी पेटिंग, अशा सगळ्या एन्टीक गोष्टी एक्झिबिशन्समध्ये जाऊन चोखंदळपणे जमवलेलं आहे. अगदी माझ्या घरात असलेली फुलझाडं सुध्दा. जंगली गुलाब आणि जंगली जास्वंदाची झाडं मी लावली आहेत. त्यामुळे त्यांची फुलंही खूप वेगळी येतात.
माझ्या घरी आलेल्या प्रत्येक माणसाचं तोंड गोड झालंच पाहिजे आणि ती व्यक्ती जाताना चेह-यावर स्माइल घेऊनच गेली पाहिजे. यासाठी मी दरवाज्याजवळ वेगवेगळ्या त-हेची चॉकलेट्स आणि माउथफ्रेशनर सुध्दा ठेवलेली आहेत. घरात जेव्हा गणेशोत्सव साजरा केला जातो. तेव्हा बाप्पाला नैवेद्य हा चॉकलेटचाच असतो. माझ्या घरी गणपती जिथे आम्ही बसवतो. त्याच भिंतींजवळ मी ख्रिसमस-ट्री सुध्दा लावते. घराच्या प्रत्येक कोप-याचं एक वैशिष्ठ्य आहे.
माझं घर खूप प्रशस्त आहे, तरीही फर्निचर असो की शोभेच्या वस्तू प्रत्येक गोष्ट आणताना मी त्या आपल्या आणि आपल्या घरच्यांच्या आवडीनिवडीला साजेशा आहेत का याचा नीट विचार करूनच आणते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गायिका नेहा राजपालच्या आलिशान घराची खास झलक...
फोटो- अजित रेडेकर