आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय-अतुलच्या करिअरला 15 वर्षे पूर्ण, या आलिशान घरात वास्तव्याला आहेत हे दोघे भाऊ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजय- अतुल ही भारतीय संगीत क्षेत्रातील आघाडीची संगीतकार जोडी... पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अजय-अतुल यांनी सिनेसृष्टीत स्वबळावर स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले असून त्यांच्या सांगितिक करिअरला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने नुकताच पुण्यात त्यांचा भव्य लाईव्ह कॉन्सर्ट सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. 2002 साली त्यांनी मराठी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. 
 
शास्त्रशुद्ध संगीताचे शिक्षण न घेताही त्यांनी संगीतात नवनवीन प्रयोग केले आहेत. 'सैराट' सिनेमाच्या माध्यमातून सातासमुद्रापार त्यांनी मराठी पताका फडकावली आहे. जे श्रवणीय वाटते, हृदयाला भिडते आणि आत्म्याला अंतर्मुख करते तेच खरे संगीत, अशी त्यांची संगीताबद्दलची भावना आहे.
 
पुण्यात आहे स्वप्नातील घर...
संघर्षातून पायवाट काढत आज यशोशिखर गाठणा-या या दोन भावांनी पुण्यात त्यांचा स्वप्नातील आशियाना उभारला आहे. पुण्यातील बाणेर परिसरात 2013मध्ये त्यांनी आलिशान घर उभे केले. स्टुडिओ फाइव्ह इंडिया या कंपनीत कार्यरत सचिन खाटपे यांनी त्यांच्या घराचे इंटेरियर डिझाइन केले आहे. सचिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय-अतुल यांची आवड-निवड लक्षात घेऊन घराचे इंटेरिअर करण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या घराला वेस्टर्नसोबतच खास मराठमोळा टच हवा होता. त्यानुसार घराला फ्युजन टच देण्यात आला आहे. नऊ ते दहा महिन्यात घराचे इंटेरियर पुर्ण करण्यात आले. तीन बेडरुम, लिव्हिंग रुम, किचन असलेल्या या घरातील लिव्हिंग रुमला इटालियन पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. एकंदरीतच घरात महाराष्ट्रीयन फ्युजन आर्किटेक्चरची झलक बघायला मिळते.

अजय-अतुल यांच्या घरात एक सुंदर मंदिर असून तिथे विठ्ठल-रुक्मिणीची सुंदर मुर्ती विराजमान आहे. शिवाय अजय अतुल यांनी घरात एक स्टुडिओ करुन घेतला आहे. येथे त्यांनी अनेक गाण्यांच्या चाली तयार केल्या आहेत.
 
अजय-अतुल यांच्या डोळे दिपवणा-या घराचे खास फोटोज प्रसिद्ध फोटोग्राफर प्रशांत भट यांनी त्यांच्या कॅमे-यात कैद केले आहेत.
 
अजय-अतुल यांच्या करिअरला 15 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा बघुयात त्यांच्या आलिशान घराचे Inside Photos. चला तर पहिल्यांदाच बघा, कसे आहे अजय-अतुल यांचे घर...
 
फोटो साभार - फोटोग्राफर प्रशांत भट
बातम्या आणखी आहेत...