आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कसा रंगला मराठी FILMFARE अवॉर्ड सोहळा, बघा सेलिब्रिटींनी शेअर केलेले INSIDE PICS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

27 नोव्हेंबरच्या रात्री मुंबईतील रिलायन्स स्टुडिओमध्ये मोठ्या जल्लोषात दुसरा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात 'कट्यार काळजात घुसली', 'ख्वाडा' या सिनेमांनी बाजी मारली. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक अशा विविध कॅटेगरीत 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यातील विजेत्यांची नावे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा... )

या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांचीही विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. आलिया भट, अनिल कपूर, सोनाली बेंद्रे, सुशांत सिंह राजपूत या कलाकारांनी सोहळ्याला उपस्थिती लावली होती. (फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटची खास झलक बघण्यासाठी येथे क्लिक करा... ) या सोहळ्याची खास छायाचित्रे अनेक मराठी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
सेलिब्रिटींनी शेअर केलेली या सोहळ्याची खास छायाचित्रे बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...