आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS: पुरस्कारांची रेलचेल, मानसी-सोनालीचा धमाकेदार डान्स, असा होता या अवॉर्ड शोचा थाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पण गौरव रजनी 2017 हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच जोगेश्वरी येथील कमल अमरोही स्टुडियोमध्ये दिमाखात पार पडला. यात 'कोडमंत्र' या नाटकाने, तर 'व्हेंटीलेटर' या चित्रपटाने बाजी मारली. 'व्हेंटीलेटर' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पटकथा, दिग्दर्शक, खलनायक, सहाय्यक अभिनेता तसेच अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट अशा 6 पुरस्कारांवर आपले नाव कोरले. चित्रपट विभागातील विविध पुरस्कारांसाठी 'कासव' या चित्रपटाला विशेष लक्षवेधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच 'दशक्रिया' या चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या अवॉर्ड सोहळ्यात अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री तितिक्षा तावडे यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. 

या अवॉर्ड सोहळ्यात चित्रपटांसोबतच मालिकांचाही गौरव झाला. 'सरस्वती' आणि 'दुहेरी' या मालिका सर्वोत्कृष्ट ठरल्या. मालिका विभागात नीलकांती पाटेकर आणि सुलेखा तळवलकर यांना विभागून सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीने पुरस्कृत करण्यात आले. 'सरस्वती' आणि 'दुहेरी' या दोन मालिकांनी सर्वोत्कृष्ट होण्याचा मान पटकावला असून, तितिक्षा तावडे आणि उपेंद्र लिमये या कलाकारांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेत्याचा मान पटकावला. तसेच अवधूत पुरोहित यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मानित करण्यात आले. 

गेली 17 वर्षे होत असलेल्या सोहळ्याचा थाट यंदाही कायम होता. कलावंतांच्या धमाल परफॉर्मन्समुळे सोहळ्याला चारचाँद लागले. सोनाली कुलकर्णी आणि मानसी नाईक यांचे डान्स परफॉर्मन्सेस या सोहळ्याचे आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरले.  

कसा होता या अवॉर्ड सोहळ्याचा थाट, बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
 
बातम्या आणखी आहेत...