आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

INTERVIEW : कसा झाला \'जय मल्हार\'चा प्रवास, जाणून घ्या कलाकारांच्या शब्दांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून - निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, सुरभी हांडे, देवदत्त नागे आणि इशा केसकर)
'जय मल्हार' या मालिकेला नुकतंच एख वर्ष पूर्ण झालं आणि या एका वर्षाच्या अविस्मरणीय प्रवासाच्या आठवणी Divyamarthi.com ला सांगितल्यात मालिकेच्या कलाकारांनी.

देवदत्त नागे – (खंडोबा)
जेव्हा मला कळलं की मी खंडेरायाची भूमिका करणार आहे, तेव्हा पहिल्यांदा मी जेजूरीला जाऊन आलो. तेव्हा लोकांचं प्रेम मिळावं अशी अपेक्षा होती. पण खंडोबाच्या कृपेने माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मला आणि मालिकेला गेल्या एका वर्षात मिळालंय. हे प्रेम, आणि हे यश तर स्वप्नवतच आहे. मालिकेसाठी आमच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत आज फळाला आलीय, असंच वाटतंय. आज प्रत्येक मालिकेच्या भागाविषयी चर्चा होते. माझी मिशी खरी आहे की खोटी.. मी बनवलेली शरीरयष्टी कशी कमावली याविषयी उत्सुकता असते. मालिकेतल्या रोजच्या ट्रॅक संदर्भातही चर्चा होते. हे सगळं सुखावह आहे. आज मालिकेमुळे खंडेराय हे शिवशंकराचा अवतार आहे, हे लोकांना कळतंय. त्याअगोदर भक्तांमध्ये खंडोबाविषयी एवढी माहिती नव्हती. मालिका सुरू झाल्यापासून रोज देवळात भक्तांची रिघ लागलेली असते. 18 मेला एक वर्षपूर्ण झालं आणि योगायोग पहा, त्याचदिवशी खंडोबाच्या देवळात सोमवती अमावस्येचा मोठा उत्सव झाला.”
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, मालिकेच्या प्रवासाविषयी काय म्हणातेय निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, सुरभी हांडे आणि इशा केसकर...