आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या सुगंधाचे बॉलीवूडमध्ये पदार्पण , आयपीएलच्या शीर्षकगीताचे गायन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांची मने जिंकणारी नागपूरची कन्या सुगंधा दाते हिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा अभिनीत "जय गंगाजल’ या चित्रपटात तिने गायलेली गाणी लोकप्रिय झाली आहेत. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या आयपीएल मॅचेससाठी तिने गायिलेले शीर्षक गीतही नुकतेच रेकॉर्ड करण्यात आले आहे. याबाबत तिने "दिव्य मराठी'शी संवाद साधला.

प्रश्न : पार्श्वनायन क्षेत्रातील पदार्पणाबाबत काय सांगशील?
सुगंधा : खूप आनंद वाटतोय. ‘जय गंगाजल’मध्ये पहिल्यांदाच गायनाची संधी मिळणे हे माझे भाग्यच समजते. गेल्या काही वर्षांपासून मी गात आहे आणि लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक दिवस मी इथपर्यंत पोहोचणार याचा विश्वास होताच. दिग्दर्शक प्रकाश झा, प्रियंका चोप्रा, संगीतकार सलीम-सुलेमान अशा दिग्गजांच्या सान्निध्यात मी बॉलीवूडमध्ये पदार्पण करीन, असे वाटले नव्हते.

प्रश्न : तू नेहमी सिरियस मूडचीच गाणी गातेस?
सुगंधा : मुळातच मला गंभीर आणि शास्त्रीय संगीत खूप आवडते. त्यामुळे अशा प्रकारच्या गाण्यांमध्ये मी रमून जाते. "जय गंगाजल'मधील माझे ‘पाखी’ हे गीतही अशाच मूडचे आहे.

प्रश्न : नागपुरातील बालपण आवडते की मुंबईतील आताचे दिवस?
सुगंधा : आमचे सर्व नातेवाईक नागपूमध्येच राहतात. माझा जन्म तिथला आहे. मात्र, करिअरसाठी मुंबईच महत्त्वाची वाटते. संगीत क्षेत्रातील दिग्गज येथेच राहतात. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळते. त्यामुळे मुंबई किंवा नागपुरात फरक करता येणार नाही.

दिग्गजांकडून मिळाले सुगंधाला गायन धडे
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवणारी सुगंधा सध्या मुंबईत प्रसिद्ध संगीतकार विशाल- शेखर आणि आनंद शर्मा यांच्याकडून गायनाचे धडे घेत आहे. इंडियन आयडॉल स्पर्धेनंतर तिला शिकवणीसाठी नियमित मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागायच्या. मात्र, मुलीच्या ध्येयासाठी वडील अमोल दाते आणि आई अमृता दाते यांनी थेट मुंबईतच वास्तव्य केले आहे. अमोल दाते टपाल खात्यात नोकरीला आहेत. संगीत क्षेत्रात करिअर करण्याचे तिचे स्वप्न आहे.
बातम्या आणखी आहेत...