आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ऑनलाइन बिनलाइन\'च्या स्टार्सनी उलगडले भूमिकांचे रहस्य, वाचा काय म्हणाले...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रेयस जाधव निर्मित आणि केदार गायकवाड दिग्दर्शित ‘ऑनलाइन बिनलाइन’ हा सिनेमा येत्या 3 जुलैला सिनेमागृहात झळकतोय. इंटरनेट आणि सोशल मिडीया शिवाय जगू न शकणा-या आजच्या पिढीविषयी मार्मिक भाष्य करणा-या या सिनेमात सिध्दार्थ चांदेकर, ऋतुजा शिंदे आणि हेमंत ढोमे आहेत. दिग्दर्शक-निर्मात्यासह पूर्ण टिमच युवा असल्याने, ऑनलाइन बिनलाइन ही फिल्म आपलंच प्रतिनिधीत्व करत असल्याचे या सिनेमाच्या पूर्ण टीमला काय वाटतं. ते आम्ही जाणून घेतलं, त्यांचे मनोगत
केदार गायकवाड – (दिग्दर्शक)
सचिन तेंडूलकर रिटायर्ड होतानाची शेवटची मॅच पाहायला मी आणि श्रेयस जाधव गेलो होतो. तेव्हा खरं तर आम्ही त्यावेळी खूप भावूक झालो होतो. आणि त्यावेळी श्रेयस मला म्हणाला, की मला तुझ्यासोबत एक चित्रपट करायचा आहे. मला वाटलं, सचिनच्या रिटायर्डमेन्टमूळे श्रेयस जरा जास्तच भावूक झाला आहे, आणि मी त्याला हलक्यात घेतलं. पण नंतर त्याने धोशाच लावला. श्रेयसला तरूणाई एन्जॉय करेल, असा सिनेमा बनवायचा होता. तर मला सामाजिक विषयावर सिनेमा बनवायचा होता. आणि मग सोशल नेटवर्किंग साइटचा विषय सुचला. आज पाच पैकी चार जणांच्या हातात मोबाईल असतो. आणि तीन जण तर सोशल नेटवर्किंग साइटवर एकदम खिळलेले असतात. याचवर तरूणांना कोपरखळी मारणारी ही फिल्म आहे. सिनेमाची संकल्पना आकाराला आल्यावर माझ्या डोक्यात हेमंत ढोमे आणि सिध्दार्थ चांदेकरच या भूमिकेसाठी परफेक्ट असल्याची कल्पना आली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, हेमंत ढोमे...निर्माता श्रेयस जाधव.... अभिनेता सिध्दार्थ चांदेकर यांचे मनोगत...
सर्व फोटो- प्रदीप चव्हाण