आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonalee Kulkarni And Sidharth Jadhav Play Lead Role In Timepass 2?

कोण असणार दगडूची प्राजक्ता, \'सोनाली-अमृता की सई\'? 13 मार्च रोजी होणार उघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिग्दर्शक रवी जाधव यांनी फेसबुक पेजवर शेअर केलेले छायाचित्र)

दिग्दर्शक रवी जाधवांनी गेल्या वर्षी टाइमपास ही निखळ प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. प्रथमेश परब आणि केतकी माटेगांवकर या सिनेमात लीड रोलमध्ये झळकले होते. आता यावर्षी 1 मे रोजी या सिनेमाचा सिक्वेल अर्थातच 'टाइमपास 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या प्रेमकहाणीत नायक ‘दगडू’ आणि नायिका ‘प्राजक्ता’ यांनी एका दुस-याला दिलेली वचने 'टाइमपास 2' मध्ये पूर्ण झालीत काय हे पाहता येणार आहे. दगडू कितवीपर्यंत शिकला? प्राजक्ताला आपण शिकून मोठे होणार असे दिलेले वचन पूर्ण केले काय? मी तुझ्याचसाठी आहे, तुझी वाट पाहीन असे सांगणारी प्राजक्ता दगडूसाठी थांबते काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि या प्रेमकहाणीचा शेवट गोड झाला की कसा? हे या सिनेमातून पाहता येणार आहे.
सिक्वेलमध्ये दगडू आणि प्राजक्ता तरुण झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे साहजिकच प्रथमेश आणि केतकी सिक्वेलमधील नायक-नायिका नसतील हे काही वेगळे सांगायला नको. मग सिक्वेलमध्ये दगडू आणि प्राजक्ताची जागा कुणी घेतली, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दिग्दर्शक रवी जाधवांनी याविषयीची मिस्ट्री कायम ठेवली आहे. मात्र त्यांनी प्रेक्षकांना याविषयी एक हिंट दिली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर तीन अभिनेत्रींची नावे घेऊन यापैकी कोण असेल दगडूची प्राजक्ता असा प्रश्न विचारला आहे. या तीन अभिनेत्री मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर या तिघींपैकी एक 'टाइमपास 2' मध्ये प्राजक्ताच्या रुपात झळकणार आहे. दगडूची प्राजक्ता कोण? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळणार आहे 13 मार्च रोजी. कारण रवी जाधव यादिवशी तिघींपैकी कोण सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे, हे उघड करणार आहेत.
प्राजक्ताविषयी एक छोटीशी हिंट मिळाली असली तरी दगडूविषयी रवी जाधवांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. आता या तिघींपैकी एक जण सिनेमात असणार हे तर नक्की. मात्र दगडूच्या रुपात मराठी इंडस्ट्रीतील कोणता अभिनेता असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. पण आम्ही दगडूविषयी एक अंदाज बांधला असून 'टाइमपास 2'मध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव दगडूच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता व्यक्त करायला काहीच हरकत नाही.
आता प्रतिक्षा फक्त दोन दिवसांची...
पुढील स्लाईड्समध्ये पाहा टाइमपास 2चे आत्तापर्यंत रिलीज करण्यात आलेले पोस्टर्स...