आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

It's Celebration Time : 'नकुशी'ची यशस्वी शंभरी, उपेंद्र लिमयेसह कलाकारांनी केला झक्कास डान्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'नकुशी.. तरीही हवीहवीशी' या मालिकेने नुकताच शंभर भागांचा यशस्वी टप्पा पार केला आहे. यानिमित्ताने सेटवर केक कापून हा आनंद साजरा केला. सेटवर कलाकार आणि मालिकेच्या संपूर्ण टीमसाठी एका छोटेखानी पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते. उपेंद्र लिमये यांच्यासोबत मालिकेच्या संपूर्ण टीमने झक्कास डान्स करत मालिकेचे यश साजरे केले.  
 
'नकुशी'सारख्या सामाजिक प्रथेवर आधारित या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. 43 दिवसांचं आऊडटोअर चित्रीकरण, कास पठारावरचं प्रेमगीत, कीर्तनाचा मालिकेच्या निवेदनासाठी केलेला वापर असे अनेक प्रयोग या मालिकेतून झाले. प्रत्यक्ष ग्रामीण भागात चित्रीकरण झालेली ही पहिली मराठी मालिका.  नकुशी प्रथा ही एक अंधश्रद्धा असून, आजही ती ग्रामीण महाराष्ट्रात कायम आहे. एक किंवा दोन मुलींनंतर पुन्हा मुलगी झाल्यास तिचं नाव नकुशी ठेवले तर पुढचे अपत्य मुलगा होतो, असा एक समज आहे. या पार्श्वभूमीवर नकुशी नाव असलेल्या मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या अनवट वळणांचा प्रवास, तिचं भावविश्व  या मालिकेत चित्रीत करण्यात आले आहे. 
 
या मालिकेचे दिग्दर्शन चित्रपट-मालिका क्षेत्रातला आघाडीचा दिग्दर्शक वैभव चिंचाळकर यांनी केले आहे. उपेंद्र सोबत प्रसिद्धी किशोर आयलवार, आदिती देशपांडे, विद्याधर जोशी, स्वाती चिटणीस, चारुदत्त आफळे यांच्या महत्त्वाच्या भूमिका या मालिकेत आहेत. 
 
पुढील स्लाईड्सवर बघा, इट्स सेलिब्रेशन टाईम म्हणत मालिकेच्या कलाकारांनी कसा केला जल्लोष.... 
बातम्या आणखी आहेत...