आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • It's Working Diwali For Riteish Deshmukh, He Gone Miss Celebration In Hometown

रितेश देशमुखची दिवाळी यंदा on Set… लातूरची दिवाळी Miss करणार सांगतोय, रितेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सगळेजण दिवाळीच्या शॉपिंगमध्ये गुंतले आहेत. आपल्या कुटूंबासोबत दिवाळी घालवायचे प्लॅन अनेक स्टार्स करतायत. त्यामूळे टीव्ही मालिका आणि चित्रपटांची शुटिंग त्याकाळात न करण्याकडे अनेक कलाकारांचा कल असताना, रितेश देशमुख मात्र यंदा आपल्या मनासारखी दिवाळी साजरी करू शकणार नाही.
रितेश देशमुख सांगतो, “दरवर्षी आम्ही लातूरला आमची दिवाळी साजरी करतो. दिवाळीची सुरूवात ‘पहिल्या पाण्या’पासून करण्याची आमच्या घरात पध्दत आहे. त्यानंतर पाडवा आणि भाऊबीजेचे महत्व असते. पण यंदा मात्र हे सगळं मी मिस करेन. गावी जाऊ शकणार नाही. कारण यंदा माझे दिवाळीच्या सुमारासच शुटिंग आहे.”
रितेश देशमुख यशराज फिल्म्सच्या बॅंकचोर आणि साजिद खानची हाऊसफुल-३ मध्ये दिसेल. ह्या दोन्ही चित्रपटांनंतर रितेश आपल्या मराठी प्रॉडक्शनकडे वळणार आहे. ह्याबद्दल सांगताना रितेश देशमुख म्हणतो, “पुढच्या वर्षीच्या माऊली चित्रपटाचे चित्रीकरणाला सुरूवात होईल. आणि त्यानंतर शिवछत्रपतींवरच्या चित्रपटावर आम्ही लक्ष केंद्रित करू. शिवाजी महाराजांच्या चित्रपटासाठी प्री-प्रॉडक्शनवर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यावर माऊलीनंतरच लक्ष केंद्रित करावं लागणार आहे.”