आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:\'जागो मोहन प्यारे\' मालिकेने पूर्ण केले 100 एपिसोड्स, पाहा सेटवरील कलाकरांची धमालमस्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील लोकप्रिय मालिका 'जागो मोहन प्यारे' मालिकेने 100 एपिसोड नुकतेच पूर्ण केले आहेत. यावेळी मालिकेतील सर्व कलाकारांनी धमाल करत सेलिब्रेशन केले आणि केक कापला. यावेळी मालिकेतील मुख्य कलाकार श्रृती मराठे, अतुल परचुरे, सुप्रिया पाठारे, उषा नाईक तसेच मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. 

 

जागो मोहन प्यारे या मालिकेचा पहिला एपिसोड 14 ऑगस्ट 2017स रोजी प्रदर्शित झाला होता. मालिकेच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत प्रेक्षकांची ही आवडती मालिका आहे. मराठी अभिनेत्री श्रुती मराठेने मालिकेत जीनीची (भानूमती)ची भूमिका केली आहे. मालिकेतील हे पात्र लोकांच्या विशेष आवडीचे आहे. मालिकेतील कलाकार शूटिंगव्यतिरीक्त एकमेकांसोबत मजा-मस्ती करतानाचे फोटो नेहमीच शेअर करत असतात त्यामुळे केवळ मालिकेसाठीच नाही तर खासगी आयुष्यातही सर्वच टीम एकमेकांबरोबर चांगलीच बॉन्डींग शेअर करत असल्याचे दिसते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा. मालिकेतील 100 एपिसोडच्या सेलिब्रेशनचे तसेच Behind the Scene फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...