आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

It\'s Party Time : \'जय मल्हार\' मालिकेची वर्षपूर्ती, कलाकारांनी केली जल्लोषात पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सेलिब्रेशन करताना 'जय मल्हार'ची टीम)

‘जय मल्हार’ ही मालिका सुरू होऊन आता एक वर्ष झालंय. 18 मे 2015 ला ही मालिका सुरू झाली आणि हळूहळू लोकांना आवडू लागली. त्यानंतर तर खंडोबाचं रोज दर्शन टीव्हीवर घेण्याची लोकांना एवढी सवय लागली की गेले काही माहिने ही मालिका सगळ्यात जास्त टीआरपी आणणारी मालिकाही ठरली. त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है ना बॉस!
शुक्रवारी रात्री ‘जय मल्हार’च्या टीमने आपल्या वर्षपूर्तीचं केले मस्त सेलिब्रेशन. यावेळी ‘खंडोबा’ देवदत्त नागे, ‘म्हाळसा’ सुरभी हांडे आणि ‘बानू’ इशा केसकर या मुख्य कलावंतासह मालिकेचे सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ पार्टीसाठी आले होते. निर्माते महेश कोठारेसुध्दा त्यांच्या मुलगा अभिनेता आदिनाथ कोठारे आणि सून अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे यांच्यासह उपस्थित होतेच. पण महेश कोठारेंचे मित्र आणि फिल्ममेकर सचिन पिळगांवकरही यावेळी उपस्थित होते. शॅम्पेन आणि केक कटिंग करून झोकात पार्टी झाली.
यावेळी दिव्य मराठीशी बोलताना सचिन पिळगांवकर म्हणाले, “माझी आई 'जय मल्हार' मालिका नित्य नियमाने दररोज पाहते आणि तिच्यामुळे मला सुध्दा ही मालिका रोज न चुकता पाहण्याची सवय लागलीय. तिला ह्या मालिकेतल्या कलाकारांची नावही माहित नाहीत पण ती खंडोबा, म्हाळसाई आणि बाणाईची चाहती आहे. आणि आतातर गेल्या एक वर्षात संध्याकाळी बॅडमिंटन खेळून आलं की ही मालिका पाहण्याची एवढी सवय लागलीय, की मी 'जय मल्हार' मालिका न पाहता राहूच शकत नाही. मालिकेचं एडिक्शनच लागलंय.”
सचिन पिळगांवकर यांनीही नव्वदीच्या दशकात ‘तू तू मैंमैं’ सारखी त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झालेली मालिका बनवली होती. त्यामुळे आता महेश कोठारेंच्या यशामुळे तुम्ही अशी मालिका कधी बनवणार का असं विचारल्यावर सचिन लगेच म्हणतात, ''अशा पध्दतीची मालिका करण्याचं शिवधनुष्य पेलणं हे फक्त महेशच करू शकतो. त्यासाठी खूप समर्पित होऊन काम करावं लागतं, ते मला जमणे नाही. आणि महेश माझा जीवलग मित्र आहे, त्यामुळे त्याने मालिका केली म्हणजेच मी केली नाही का”
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'जय मल्हार'च्या कलाकारांनी केलेल्या सेलिब्रेशनची खास झलक...