आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: बघा कसे तयार होतात \'खंडेराय\', जाऊयात थेट देवदत्त नागेंच्या ग्रीन रुममध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी झी मराठीवरील ‘जय मल्हार’ ही मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. झी मराठी वाहिनीवरून प्रसारित होणा-या या मालिकेची सुरुवात साधारण दोन वर्षांपूर्वी झाली आणि या मालिकेने एक इतिहास रचला. आज केवळ महाराष्ट्राच नाही तर देशभरात आणि जगातही जिथे जिथे मराठी प्रेक्षकवर्ग आणि खंडोबांचा भक्तगण आहे तिथे तिथे ही मालिका पोहोचली आहे. मालिकेसोबतच यातील कलाकारांना म्हणजेच मल्हार देवाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे, म्हाळसाबाईंच्या भूमिकेतील सुरभी हांडे आणि बानूबाईंच्या भूमिकेतील ईशा केसकर यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.  

भव्य दिव्य सेट्स, स्पेशल इफेक्ट्स कलाकारांसाठी तयार करण्यात आलेली आभुषणे सर्वकाही डोळे दिपवणारे आहेत. पिळदार शरीरयष्टी असलेले अभिनेते देवदत्त नागे खंडेरायच्या भूमिकेत अगदी फिट बसले आहेत. या मालिकेसाठी त्यांनी बरीच मेहनत घेतलेली दिसते. खंडेरायाच्या भूमिकेसाठी तयार होताना त्यांना साधरण दररोज एक तास लागतो. आज आम्ही तुम्हाला घेऊन जातोय, देवदत्त नागे यांच्या ग्रीन रुममध्ये... खंडेरायाच्या भूमिकेसाठी देवदत्त नागे कसे तयार होतात, हे तुम्हाला येथे बघायला मिळणारेय. 

चला तर मग जाऊयात, देवदत्त यांच्या ग्रीन रुममध्ये आणि बघुताय खंडेराय कसे तयार होतात...   
बातम्या आणखी आहेत...