आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जय मल्हार\'ने घेतला प्रेक्षकांचा निरोप, Photosमधून बघा मालिकेसाठी कसे तयार व्हायचे \'खंडेराय\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दररोज संध्याकाळी सात वाजता छोट्या पडद्यावर अगड दुम नगारा, सोन्याची जेजुरी... हे शीर्षकगीत लागले, की घरातील ज्येष्ठ नागरिक, महिला टीव्हीसमोर येऊन बसत होत्या. मात्र आता हे शीर्षकगीत आणि मालिकेतील सर्व पात्रांना प्रेक्षक मिस करणार आहेत. कारण रविवारी म्हणजे 30 एप्रिल रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेतला आहे. मे 2014 पासून झी मराठी वाहिनीवर सुरु झालेल्या या मालिकेचा रविवारी शेवटचा भाग प्रक्षेपित झाला. खंडेराय, म्हाळसा आणि बाणाई यांच्या कैलास प्रस्थानासोबत या मालिकेने पूर्वविराम घेतला.    

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी झी मराठीवरील ‘जय मल्हार’ ही मालिका अतिशय लोकप्रिय ठरली होती. केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरात आणि जगातही जिथे जिथे मराठी प्रेक्षकवर्ग आणि खंडोबांचा भक्तगण आहे तिथे तिथे ही मालिका पोहोचली. मालिकेसोबतच यातील कलाकारांना म्हणजेच मल्हार देवाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे, म्हाळसाबाईंच्या भूमिकेतील सुरभी हांडे आणि बानूबाईंच्या भूमिकेतील ईशा केसकर यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली.  
 
भव्य दिव्य सेट्स, स्पेशल इफेक्ट्स कलाकारांसाठी तयार करण्यात आलेली आभुषणे सर्वकाही डोळे दिपवणारे होते. पिळदार शरीरयष्टी असलेले अभिनेते देवदत्त नागे खंडेरायच्या भूमिकेत अगदी फिट बसले. या मालिकेसाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली दिसते. खंडेरायाच्या भूमिकेसाठी तयार होताना त्यांना साधरण दररोज एक तास लागायचा. ही मालिका आता संपली असली, तरी यातील कलाकार नक्कीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील. या मालिकेतील खंडेरायाच्या भूमिकेसाठी देवदत्त नागे कसे तयार व्हायचे, याची एक छोटीशी झलक आम्ही तुमच्यासाठी खास छायाचित्रांच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत.  
 
चला तर मग, बघुताय खंडेरायाच्या भूमिकेसाठी देवदत्त नागे कसे तयार होत असत...  
बातम्या आणखी आहेत...