आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jai Malhar Fame Actor Atul Abhyankar Died At The Age Of 42

\'जय मल्हार\' मालिकेतील अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे निधन, तीन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिवंगत अभिनेतेे अतुल अभ्यंकर)

मुंबईः झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘जय मल्हार’ या मालिकेतील हेगडी प्रधानांची भूमिका साकारणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे आज (12 नोव्हेंबर) पहाटे तीन वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि आई असा परिवार आहे. तीन महिन्यांपूर्वीच अतुल विवाहबद्ध झाले होते.
'जय मल्हार' या मालिकेतील भूमिकेसाठी त्यांना नुकताच झी मराठी अॅवॉर्डस 2014 चा सर्वोत्कृष्ट पुरुष व्यक्तिरेखेचा पुरस्कार मिळाला होता. सारंगा तेरी याद में, मी नथुराम गोसडे बोलतोय, काय बाई सांगू, केशवा माधवा, सारे प्रवासी घडीचे, आई रिटायर होतेय यांसारख्या नाटकांमधून अतुल अभ्यंकर यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. लहानपणापासूनच दादरमध्ये वाढलेल्या अतुल अभ्यंकर यांचे शालेय शिक्षण बालमोहनमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण कीर्तीमध्ये झाले होते. अभियनाबरोबरच ते गाणंही उत्तम गायचे.
अभ्यंकर यांच्या निधनानंतर कलाकारांच्या चित्रीकरणादरम्यान वाढणारा ताण आणि वेळेची अनियमितता हा प्रश्न शिवसेना चित्रपट सेनेने उठवला आहे. कलाकारांची शिफ्ट दहा तासांची करण्याची शिवसेनेच्या चित्रपट सेना सर्व वाहिन्या आणि निर्मात्यांना करणार आहे. अतुल अभ्यंकर यांच्या निधनानंतर शिवसेना चित्रपट सेनेने हा पवित्रा घेतला आहे. तसंच कलाकारांनी दीड शिफ्टपेक्षा जास्त काम करु नये, असे आवाहन चित्रपट सेनेने मराठी कलाकारांना केले आहे
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अभिनेते अतुल अभ्यंकर यांची निवडक छायाचित्रे...