आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: केमिस्ट्री ग्रॅज्युएट आहे 'खंडोबा', अभिनेताच नव्हे तर आहे उत्तम चित्रकारसुद्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'जय मल्हार' या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारा, पिळदार शरीरयष्टी, भारदस्त आवाज आणि तितकाच दमदार अभिनय करणारे अभिनेता म्हणजे देवदत्त नागे. मुळचे अलिबागचे असलेल्या देवदत्त नागेंचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. खंडोबाच्या भूमिकेतून देवदत्त नागे घराघरांत पोहोचले आहेत.त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या खासगी आयुष्याविषयीची माहिती आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून देतोय.

कुटुंबाविषयी...
देवदत्त नागे विवाहित असून त्यांना एक मुलगा आहे. कांचन हे त्यांच्या पत्नीचे तर निहार हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. त्यांना तीन थोरल्या बहिणी आहेत. देवदत्त यांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र त्यांनी अभिनयाची निवड केली.

पुढे वाचा, मॉडेलिंगद्वारे करिअरला सुरुवात
बातम्या आणखी आहेत...