आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या प्रचारासाठी अवतरली ‘जय मल्हार’मधील ‘म्हाळसा’, बघा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यातल्या जिल्हा परिषदाच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या प्रचार तोफा थंडावल्या. मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जालन्यातील शिवसेनेच्या एका उमेदवाराने मराठी अभिनेत्रीला प्रचारासाठी आमंत्रित केले होते. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गटातील शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार महेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ ‘जय मल्हार’ मालिका फेम ‘म्हाळसा’ अर्थात अभिनेत्री सुरभी हांडे हिने हजेरी लावली. शिवसेनेच्या प्रचारादरम्यान सुरभीने जाहीर सभेला संबोधित केलं. या सभेच्या माध्यमातून सुरभीने उपस्थित मतदारांना ‘जय म्हल्हार’चं कथानक ऐकवून मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी तीर्थपुरीमध्ये सुरभीला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

पुढील स्लाईड्सवर बघा, प्रचारादरम्यान क्लिक झालेली म्हाळसाची अर्थातच अभिनेत्री सुरभी हांडेची निवडक छायाचित्रे...  
बातम्या आणखी आहेत...