आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जय मल्हार\'च्या निनादाने दुमदुमली निलेश साबळेची थुकरटवाडी, बघा खास PICS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः सोमवारी निलेश साबळेची थुकरटवाडी 'जय मल्हार'च्या निनादाने दुमदुमली. झी मराठी वाहिनीवर गाजत असलेल्या 'जय मल्हार' या मालिकेची संपूर्ण टीम 'चला हवा येऊ द्या'च्या सोमवारच्या भागात अवतरली होती. देवदत्त नागे, सुरभी हांडे आणि इशा कासेकर यांनी सादर केलेल्या सादरीकरणाामुळे अतिशय सुंदर आणि स्वर्गीय सुरुवात या शोची झाली.
'जय मल्हार' या मालिकेला सुरु होऊन दोन वर्षे झाली आहेत. अल्पावधीतच ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली आहे. याच निमित्ताने मालिकेचे निर्माते महेश कोठारे, कलाकार देवदत्त नागे, सुरभी हांडे, इशा कासेकर, नकुल घाटणेकर यांच्यासोबत या मालिकेच्या सेटवर पोहोचले. सगळ्यांनीची या शोमध्ये भरपूर धमाल-मस्ती केली.
निलेश साबळेच्या टीमने माझा छकुलाचे सुंदर विडंबन यावेळी केले. त्यांच्या या स्किटने महेश काठारेंसह सगळ्यांनाच पोटधरुन हसवले. विशेष म्हणजे यावेळी महेश कोठारेंनी भाऊ कदमसोबत तालसुद्धा धरला. हीच टीम मंगळवारच्या भागातसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येेणारेय.
छायाचित्रांमधून बघा, कसा रंगला सोमवारचा चला हवा येऊ द्याचा जय मल्हार स्पेशल एपिसोड...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...