आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन@60: बर्थडे पार्टीत पोहोचले जॅकी श्रॉफ, जया बच्चनसह दिसला सलमान खानचा \'बॉडीगार्ड\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन यांच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेले मान्यवर - Divya Marathi
सचिन यांच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेले मान्यवर
एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने 17 ऑगस्ट रोजी मुंबईत एका जंगी बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

जया बच्चन यांची उपस्थिती...  
सचिन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी आवर्जुन हजेरी लावली होती. 'शोले' या चित्रपटात सचिन यांनी जया बच्चन, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी या दिग्गजांसोबत काम केले होते. तेव्हापासून बच्चन कुटुंबीयांसोबत सचिन यांचे ऋणानुबंध आहेत. जया बच्चन पार्टीत पोहोचल्यानंतर सचिन यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या पाया पडल्या. सचिन-सुप्रिया यांची लेक श्रिया हिनेदेखील जया बच्चन यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. 

सलमानच्या बॉडीगार्डसह दिसले बॉलिवूड सेलेब्स...  
या पार्टीत अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने उपस्थिती लावली होती. शिवाय अभिनेते जॅकी श्रॉफ, गायक शान, काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी, दिग्दर्शक अब्बास-मस्तान, अभिनेते सतीश शाह, तौफिक कुरैशी, विंदू दारा सिंग आणि त्याची पत्नी, बप्पी लहरी आणि त्यांच्या पत्नी, दिग्दर्शक गोविंद निहलानी, भूषण कुमार या दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. 

पाहुयात, सचिन पिळगांवकर यांच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींची खास छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...