आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे अभिनेते जयवंत वाडकर यांची लाडकी लेक, आकाशसोबत झळकणारेय सिल्व्हर स्क्रिनवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये आपल्या आईवडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवण्याचा ट्रेंड तसा जुनाच. येथे अनेक सेलिब्रिटी किड्सनी आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केले. आता हाच ट्रेंड हळूहळू मराठी सिनेसृष्टीतही दिसून येतोय. काही दिवसांपूर्वीच अभिनेते सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकर, दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे, उदय टिकेकरांची कन्या स्वानंदी टिकेकर, मोहन गोखलेंची कन्या सखी गोखले यांनी अभिनय श्रेत्रात पदार्पण केले. आता आणखी एक स्टारकिड सिनेसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. आम्ही बोलयोत ते प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनी वाडकर हिच्याविषयी.  
 
स्वामिनी लवकरच 'सैराट' फेम अभिनेता आकाश ठोसरसोबत सिल्व्हर स्क्रिन शेअर करताना दिसणारेय. महेश मांजरेकर दिग्दर्शक FU या सिनेमातून स्वामिनी अभिनय करिअरचा श्रीगणेशा करतेय. 8 मे 1995 रोजी जन्मलेली स्वामिनी आता 22 वर्षांची असून तिला नृत्याची विशेष आवड आहे. स्वामिनी सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे विविध फोटोशूट आणि सिनेमाच्या सेटवरील फोटोज बघायला मिळतात. 

महेश मांजरेकर दिग्दर्शित FU या सिनेमाच्या टीजरमध्ये स्वामिनीची झलक बघायला मिळतेय. या सिनेमात आकाश ठोसर, सत्या मांजरेकर, वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे, मयुरेश पेम, माधव देवचक्के, मधुरा देशपांडे ही कलाकारांची नवी फळी बघायला मिळणारेय. येत्या 2 जून रोजी स्वामिनीचा पहिला वहिला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय. 

पुढील स्लाईड्सवर बघा, स्वामिनीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेले खास Photos... 
 
बातम्या आणखी आहेत...