आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ती सध्या काय करतेय\'च्या निमित्ताने जितेंद्र जोशी म्हणतो...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतीश राजवाडे दिग्दर्शिक \'ती सध्या काय करतेय\' हा सिनेमा शुक्रवारी सिनेरसिकांच्या भेटीला आला. अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान या दोन नावाजलेल्या कलाकारांसोबत अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर या दोन नवोदितांनी रुपेरी पडद्यावर दमदार पदार्पण केलंय. आर्याला आपण सारेगमप लिटील चॅम्प्स या सांगितिक रिअॅलिटी शोपासून ओळखतो. तर अभिनय बेर्डे हा प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करुन अभिनय त्याच्या आईवडिलांचा अभिनयाचा वारसा आता पुढे नेतोय. या सिनेमाचा ट्रेलर, गाणी रिलीज झाल्यापासून सिनेमाविषयीची सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर शुक्रवारी सिनेमा रिलीज झाला आणि सिनेमाची कथा, संगीत, दिग्दर्शन आणि कलाकारांच्या अभिनयाविषयी भरभरुन बोललं जातंय. सर्व सामान्यच नव्हे तर मराठी इंडस्ट्रीतील कलाकार या सिनेमाचे कौतुक करताना थकत नाहीयेत. असाच एक कलाकार ज्याने या सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासोबत त्याच्या करिअरची सुरुवात केली, त्याने या सिनेमाविषयीचे त्याचे मत मांडले आहे. आम्ही बोलतोय ते अभिनेता जितेंद्र जोशीविषयी. जितेंद्रने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात सतीश राजवाडे यांच्यासोबत त्यांचा सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. हा सिनेमा बघून जितेंद्रने गतआठवणींना उजाळा देत सिनेमाविषयी त्याला नेमके काय वाटले, ते फेसबुकच्या माध्यमातून मांडले आहे. 
 
चला तर मग आपल्या या खास मित्राचा सिनेमा बघून काय वाटलं जितेंद्रला वाचा, त्याच्याच शब्दांत...   
बातम्या आणखी आहेत...