आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सैफ अली खानसोबत झळकणार आहे जितेंद्र जोशी, मुंबईत सुरु केले शूटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता सैफ अली खान 'शेफ', 'कालाकांडी' आणि 'बाजार' या चित्रपटांव्यतिरिक्त एका वेब सीरीजमध्ये झळकणार आहे. 'Sacred Games' हे त्याच्या नेटफ्लिक्स सीरिजचे नाव असून यामध्ये मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशी सैफसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. बुधवारी सैफ आणि जितेंद्र यांनी मुंबईत या वेब सीरिजसाठी शूटिंग सुरु केले आहे. शूटिंग सेटवरील फोटोजमध्ये सैफ सरदारच्या रुपात दिसतोय. तर त्याच्या शेजारी जितेंद्र जोशी हवालदाराच्या रुपात ड्रायव्हिंग सीटवर दिसतोय.  
 
अमेरिकेचे प्रसिद्ध ऑनलाइन एंटरटेन्मेंट प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स पहिल्यांदा भारतीय सीरिज घेऊन येत आहे. यामध्ये सैफ सरदारच्या रुपात असून त्याने चाळिशीतील व्यक्तीची भूमिका वठवली आहे. तो आपल्या पत्नीपासून विभक्त झाला आहे. तर जितेंद्र जोशीची भूमिका नेमकी काय असेल, हे मात्र सध्या तरी गुलदस्त्यात आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित ही सीरिज विक्रम चंद्रांच्या नॉव्हेलवर आधारित आहे. या नॉव्हेलचे शीर्षकच 'विक्रम चंद्रा' आहे.

पुढील 2 स्लाईड्सवर बघा, शूटिंग सेटवरील जितेंद्र जोशी आणि सैफ अली खानचे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...