आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'चला हवा' येऊ द्या'च्या सेटवर पोहोचला हॅण्डसम जॉन, थुकरटवाडीत केली धमाल-मस्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर अभिनेता जॉन अब्राहम - Divya Marathi
'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर अभिनेता जॉन अब्राहम
एन्टरटेन्मेंट डेस्क: प्रेक्षकांना पोटधरुन हसवणा-या 'चला हवा' येऊ द्या' या कार्यक्रमात अनेक मराठी सेलिब्रिटी आपल्या सिनेमा आणि नाटकांच्या प्रमोशनसाठी येत असतात. या कार्यक्रमाची लोकप्रियता एवढी आहे, की आता केवळ मराठीच नव्हे तर हिंदीतील सेलिब्रिटीसुद्धा सिनेमाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोनम कपूर 'नीरजा' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आली होती. आता बॉलिवूडचा हॅण्डसम हंक जॉन अब्राहम या शोमध्ये हजेरी लावणारेय. जॉन त्याच्या आगामी ‘रॉकी हॅण्डसम’ सिनेमाचे प्रमोशन करताना शोमध्ये दिसणारेय. जॉनसोबतच निशीकांत कामतसुद्धा या कार्यक्रमात येणार आहेत.

थुकरटवाडीत आल्यानंतर जॉन चक्क मराठीतून संवाद साधताना दिसला. सोमवारच्या भागात 'चला हवा' येऊ द्या' जॉन अब्राहम स्पेशल शो प्रेक्षकांना नक्कीच एन्टरटेनिंग असणारेय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, शोच्या सेटवर क्लिक झालेली जॉनची झलक...
बातम्या आणखी आहेत...