'सैराट' या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने यंदा दहावीची परीक्षा दिली होती. नववीत 81 टक्के गुण मिळवणारी रिंकू दहावीत किती टक्के गुण मिळवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. शाळेत एक दिवसही न जाता रिंकूने दहावीत 66 टक्के गुण मिळवले. शूटिंग आणि अभ्यास यात समतोल साधत रिंकूने दहावीत हे यश मिळवले आहे.
दहावीचा निकाल लागण्याआधीपासून आणि तो लागल्यानंतर ''आर्ची''वर काही जोक्स सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत. ‘मराठीत सांगितलेलं कळतं नाही का? इंग्लिशमध्ये सांगू?’ या तिच्या पडद्यावरच्या हिट डायलॉगवरुन अनेक जोक्स येत आहेत. विशेष म्हणजे तिच्या इंग्रजीच्या मार्कांवरून सोशल मीडियावर खूप जोक्स फिरत आहेत. इंग्रजीच्या मार्कांवरून व्हायरल होणाऱ्या जोक्सवर प्रतिक्रिया देताना रिंकू म्हणाली की, ''मला या गोष्टीचा राग येत नाही, उलट मी या जोक्सचा आनंद घेते.''
आर्ची – मराठीत सांगितलेलं समजत नाही? इंग्लिशमध्ये सांगू ?
परशा – नको मराठीतच सांग ….पहिले इंग्रजीमधले मार्क सांग तुझे.... 'आर्ची'वरचा हा जोक तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
आर्चीवर आणखी कोणकोणते जोक्स व्हायरल होत आहेत, वाचा पुढील स्लाईड्सवर... आणि बघा, तिला शुभेच्छा देणारे होर्डिंग...