आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Serial Ka Re Durava Completed 200 Episodes

It\'s Time To Celebrate : \'का रे दुरावा\'ने गाठला 200 एडिसोड्सचा यशस्वी टप्पा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('का रे दुरावा'च्या सेटवर झालेले सेलिब्रेशन)
झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी 'का रे दुरावा' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेने नुकताच 200 एपिसोड्स यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. या निमित्ताने मालिकेतील कलाकारांनी सेटवर केक कापून यशाचा हा आनंद साजरा केला.
18 ऑगस्टपासून ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली आणि बघता बघता प्रेक्षकांनी या मालिकेला आपलेसे केले. संसारात पती-पत्नीला अनेक गोष्टींमध्ये तडजोडी कराव्या लागतात. यातील काही तडजोडी या स्वेच्छेने केलेल्या असतात, तर काही अनिच्छेने. अशा तडजोडीमुळे अनेकदा नात्यामध्ये कटुपणासुद्धा येतो. पण काही तडजोडी केल्यानंतरही संसारातील गोडवा टिकून राहत असेल आणि दिवसागणिक प्रेम वाढतच असेल तर ती तडजोड पण गोडच वाटते. अशाच तडजोडीची आणि प्रेमाची कथा म्हणजे ही मालिका आहे.
सुयश टिळक, सुरुची अडारकर, अरुण नलावडे, सुनील तावडे, विशाखा सुभेदार, सुबोध भावे, नेहा जोशी या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या मालिकेत आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'का रे दुरावा'च्या सेटवर झालेल्या सेलिब्रेशनची ही एक खास झलक...