आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World : \'का रे दुरावा\'मध्ये इंट्रेस्टिंग ट्रॅक, अदितीने वडिलांना सुनावले खडे बोले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या मराठी मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'का रे दुरावा'. सध्या या मालिकेत दाभोळकर विरुद्ध जय असा संघर्ष सुरु झाला आहे. 3 जून रोजी या मालिकेचा 276 वा भाग प्रसारित झाला. या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलं, हे आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगत आहोत... चला तर मग जाणून घ्या 'का रे दुरावा'चा लेटेस्ट ट्रॅक...
झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणा-या 'का रे दुरावा' या मालिकेत सध्या इंट्रेस्टिंग ट्रॅक प्रेक्षकांना बघायला मिळतोय. जयने आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी दिवसरात्र एक केली पण दाभोळकरांनी अर्थातच अदितीच्या वडिलांनी त्याच्या स्वप्नांचा चुरडा केला. जयच्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवण्यास साफ नकार दिला. बीडकरांसमोर फक्त चेक नव्हे तर जयच्या आत्मविश्वासाचे देखील तुकडे तुकडे केले. इतकेच नाही तर देव टुअर्समध्ये फोन करुन अविनाश सरांना जय नवीन बिझनेसच्या निमित्ताने आपल्याला भेटायला आला होता याबद्दल सांगितले.
रागाच्या भरात अविनाशने जयवर विश्वासघाताचा आरोप केला आणि नोकरीवरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला. साहजिकच या सर्व परिस्थितीला सामोरे जाताना जय खचला. मात्र अदितीने हिंमत सोडली नाही. तिने अविनाशला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फोल ठरला. तेव्हा तिनेही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि आऊंना जयने नवीन कामाची कल्पना दिली असल्याचे अविनाशला सांगितले.
आऊनेही अविनाशची समजूत घातली. त्याचा परिणाम म्हणून अविनाशला आपली चुक उमगली आणि त्याने सर्व स्टाफसमोर जयची माफी मागितली आणि त्याला नोकरीवरुन काढण्याचा निर्णय मागे घेतला. अदितीनेही आपला राजीनामा मागे घेतला. एक संधी हुकली म्हणून निराश होऊन न जाता पुन्हा त्याच हिंमतीने उभे राहण्याचा पाठिंबा अदितीने जयला दिला आहे. मात्र पुन्हा एकदा जयला शुन्यातून सुरुवात करायची आहे. आपल्या प्रोजेक्टसाठी नवीन गुंतवणूकदाराचा त्याला शोध घ्यायचा आहे. अण्णांच्या बायपाससाठी पैसा उभा करायचा आहे. ठरलेल्या वेळातच अण्णांचे ऑपरेशन कसे होणार, त्यासाठी पैसा कोठून येणार? या विचारात जय आहे.
तर दुसरीकडे अदिती जयला काहीही न सांगता वडील दाभोळकरांना भेटायला त्यांच्या घरी जाते. मुलगी परत आल्याचा आनंद त्यांना होतो. मात्र आपण येथे दाभोळकरांची मुलगी नव्हे तर अदिती जयराम खानोलकर म्हणून आल्याचे अदिती स्पष्ट करते. हे ऐकून दाभोळकरांना धक्का बसतो. जयच्या कामाविषयी अविनाशला का सांगितले, याचा जाब ती आपल्या वडिलांना विचारते आणि त्यांना चांगलेच खडे बोल सुनावते.
मी जयला कधीही जिंकू देणार नाही, असे उत्तर दाभोळकर अदितीला देतात. त्यावर प्रतिउत्तर देताना मी कधीही जयला हरु देणार नाही, असे चोख उत्तर अदिती दाभोळकरांना देते.
आता जय आपला नवीन बिझनेस कसा उभा करणार? अदिती दाभोळकरांच्या कटकारस्थानांना कसे थांबवणार ? अण्णांचे ऑपरेशन ठरलेल्या वेळेत होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला का रे दुरावा या मालिकेच्या येणा-या भागांमध्ये मिळतील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, 'का रे दुरावा' मालिकेतील शुक्रवारच्या एपिसोडची खास झलक...