'का रे दुरावा' या प्रसिद्ध मराठी मालिकेने 100 एपिसोड्स पूर्ण केले आहे. मालिकेचे 100 भाग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानिमित्त सर्व स्टार्सकास्टने सेलिब्रेशन केले. हे सेलिब्रेशन मालिकेच्या सेटवर सर्व क्रू मेंबर्ससोबत करण्यात आले. यावेळी मालिकेतील सर्व कलाकार एन्जॉय करताना दिसले.
का रे दुरावा ही तडजोड करत संसार करणा-या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील जय आणि आदिती या जोडप्याची कथा आहे.
आपल्या लग्नाचे रहस्य गुपित ठेवून ऑफिसमध्ये सोबत काम करणारे हे जोडपे सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
जयला एक यशस्वी उद्योगपती होण्याचे स्वप्न आहे. पण आयुष्यात समोर येणा-या अडथळ्यांमुळे जय आणि आदितीला नोकरी करावी लागते. काम मिळवण्यासाठी दोघेही लग्न न झाल्याने खोटे बोलून एकाच ठिकाणी नोकरी करतात.
ऑफिसमध्ये नवरा-बायकोचे नाते विसरून दोघे सहकारी म्हणून काम करतात. अनेक प्रसंगांना त्यांना समोरे जावे लागते. अशा अनेक समस्यांच्या आणि अनोख्या प्रेमाच्या नात्यावर गुंफण्यात आलेल्या या मालिकेला आज महाराष्ट्रात भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
या मालिकेत सुरची अडारकर (आदिती), सुयश टिळक (जय), राजन भिसे, सुनील तावडे, अरुण नलावडे, विशाखा सुबेदार, प्रफुल सामंत, प्राजक्ता दिघे, नेहा जोशी सुबोध भावे, नेहा शितोळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन जालिंदर कुंभारने केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा का रे दुरावा मालिकेच्या सेलिब्रेशनची छायाचित्रे...